Tarun Bharat

‘वारी विवेकाची’ तीन दिवशीय ऑनलाईन व्याख्यानमाला

Advertisements

महाराष्ट्र अंनिसचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी / सांगली

महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरेतील अनेक संतानी आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर प्रहार करुन समाजात विवेकी नीतीमूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. ही संताची पुरोगामी परंपरा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे चालवत आहे. अशा या पुरोगामी संत विचारांचा जागर करणेसाठी शुक्रवार १६ जुलै ते रविवार १८ जुलै पर्यंत’वारी विवेकाची’ ही तीन दिवशीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याखानमाला आयोजित केली आहे.

१६ जुलैला सायंकाळी ६ वाजता ह.भ.प.ॲड.देवदत्त परुळेकर, वेंगुर्ला यांचे” संत विचार आणि धर्म चिकित्सा” या विषयावर , १७ जुलै रोजी ह.भ.प. डॉ सुहास फडतरे महाराज, कोरेगाव, सातारा यांचे ” अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संतांचा जागर” तर. ,१८ जुलैला ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज, मुंबई यांचे ” संतविचार आणि भारतीय संविधान” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

error: Content is protected !!