Tarun Bharat

वार्षिक आराखडय़ाला 80 कोटीची कात्री

कोकण विभागात सिंधुदुर्गचा सर्वात कमी विकास निधीचा आराखडा मंजूर

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या 2021-22 या पुढील वर्षाच्या 170 कोटीच्या जिल्हा वार्षिक आराखडय़ास शासनाने मंजुरी दिली. परंतु 250 कोटीच्या आराखडय़ाला 80 कोटींची मोठी कात्री लावली आहे. तसेच कोकण विभागात सर्वात कमी निधीचा सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा आराखडा मंजूर केला गेला आहे. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होणार आहे.

मंत्रालयात गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोकण विभागातील जिल्हय़ांच्या वार्षिक सर्वसाधारण आराखडय़ांना मंजुरी देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा सर्वात कमी विकास निधीचा 170 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला. दरम्यान 2020-21 या विद्यमान वर्षातील 143 कोटीच्या आरखडय़ापेक्षा पुढील वर्षाच्या आराखडय़ात 27 कोटीचा जादा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र 250 कोटीच्या प्रस्तावित आराखडय़ात 80 कोटीची कात्री लावण्यात आली आहे.

पालघर जिल्हय़ाला 175 कोटी, रत्नागिरीसाठी 250 कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासासाठी 170 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ठाणे – 450, रायगड – 275, मुंबई शहर – 180, मुंबई उपनगर – 440 या सर्व जिल्हय़ांना सिंधुदुर्ग जिल्हय़ापेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे.

दीपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हय़ाचा वार्षिक विकास आराखडा 225 कोटापर्यंत नेला होता. मात्र नंतर जिल्हय़ाचा विकास आराखडा खाली आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पर्यटन वृद्धी व स्थानिकांना रोजगार या दृष्टिकोनातून शाश्वत पर्यटन विकास करण्यासाठी 2020-21 या वर्षात जिल्हा प्रशासनाने 240 कोटीचा आराखडा प्रस्तावित केला होता. त्यापैकी 143 कोटींचा आराखडा मंजूर होऊन निधीही प्राप्त झाला होता. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे आराखडय़ाला कात्री लागली होती. त्यामुळे नवीन वर्षात 2021-22 या वर्षासाठी 250 कोटीचा जिल्हा वार्षिक योजना आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता. या आराखडय़ाला मंजुरी देताना मंत्रालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत 170 कोटीच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. नव्या वर्षासाठी 27 कोटीचा जादा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र 250 कोटीच्या आराखडय़ात 80 कोटी कमी करून मोठी कात्री लावली गेली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधु-रत्न समृद्धी विकास योजना जाहीर केली होती. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विमानतळाकडे जाणारे रस्ते, सिंधुदुर्ग नवनगर विकास प्राधिकरणासाठी निधी, आचार्य बाळशास्त्राr जांभेकर स्मृती भवन यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही  जिल्हय़ांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या रत्न सिंधू समृद्धी विकास योजनेसाठी तीन वर्षासाठी 500 कोटीचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. या योजनेतून निधी मिळाल्यास जिल्हय़ाच्या विकासाला निधी मिळू शकतो.

Related Stories

दापोलीत दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

Patil_p

‘नीट’ परिक्षार्थींना गोव्यात थेट प्रवेश द्या!

NIKHIL_N

रत्नागिरीतील विमानतळाचे काम लवकरच सुरु होणार

Patil_p

कोकण मार्गावर आणखी एक फेस्टिवल स्पेशल धावणार

Patil_p

गोवा विधानसभा : काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Abhijeet Khandekar

कुरधुंडा येथील अपघातात चौघेजण जखमी

Omkar B