Tarun Bharat

वाळकीत धनाजी पाटील यांचा सत्कार

वार्ताहर/ पट्टणकुडी

वाळकी येथील आजी-माजी सैनिक संघटनेतर्फे सेवानिवृत्त कॅप्टन धनाजी पाटील व नूतन ग्रा. पं. सदस्य प्रकाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी कॅप्टन यशवंत पाटील यांनी स्वागत केले. युवा नेते सुजय पाटील व बाबासाहेब साळुंखे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन बाळासाहेब साळुंखे-चिखलव्हाळ होते.

कॅप्टन धनाजी पाटील हे 1991 साली भारतीय सेनेमध्ये दाखल झाले. वेलिंग्टन येथून एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी 12 मद्रास रेजिमेंटमध्ये सेवा दिली. त्यानंतर नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश, फिरोजपूर, कचबूज ग्लेशियर बेट त्याचबरोबर बर्फाळ प्रदेशामध्ये त्यांनी सुमारे 23 वर्षे भारतीय सेनेमध्ये सेवा दिली आहे. 31 डिसेंबर रोजी ते कॅप्टन पदावरून निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सत्याप्पा खोत, मारुती नाईक, भीमराव पाटील, तुकाराम पाटील,ज्ञानदेव कुंभार, वसंत पाटील, आबासाहेब पाटील, उदय पाटील, दिलीप लाटकर, भीमराव बनकनावर, अर्जुन पाटील, मोहन पाटील, कॅप्टन आप्पासाहेब नाईक, चंद्रकांत मठपती, अमोल शिंदे, बाळासाहेब देशमाने, किरण खोत, महादेव चौगुले, सुनील पाटील, संतोष पाटील, काकासाहेब नाईक उपस्थित होते.

Related Stories

1 नोव्हेंबर काळय़ादिनी लाक्षणिक उपोषण

Amit Kulkarni

कारवार बसस्थानकात उद्घाटनापूर्वीच समस्या

Amit Kulkarni

बेळगावचे विमानतळ ठरतेय हुबळीपेक्षा सरस

Patil_p

बेळगावात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

पुन्हा हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्याचा प्रयत्न

Patil_p

रस्ता मोठा पण परिस्थिती जैसे थे च

Amit Kulkarni