Tarun Bharat

वाळपई-सोनाळ रस्त्यावरील दरड एकाच दिवसांत हटविली

Advertisements

रस्ता वाहतुकीसाठी मोकळा

प्रतिनिधी /वाळपई

वाळपई-सोनाळ दरम्यानच्या मार्गावर कुडसे गावानजीक रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे काही प्रमाणात समस्या निर्माण झाली होती. वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सतर्कतेमुळे दिवसभरात सदर दरड दूर केल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झालेला आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 याबाबतची माहिती अशी की वाळपई सोनाळ दरम्यान कुडसे गावाच्या नजीक याठिकाणी रविवारी संध्याकाळी दरड कोसळल्याने माती रस्त्यावर पसरली होती. यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला होता. सदर भागातून एकेरी स्वरूपाची वाहतूक सुरू होती.  यासंदर्भात दखल घेऊन वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी ताबडतोब यासंदर्भात दरडी हटवण्याचे आदेश दिले. यामुळे दुपारपासून दरडी हटविण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरूवात करण्यात आली . संध्याकाळी उशिरापर्यंत सदर दरड पूर्णपणे हटविण्यात आलेली आहे. यामुळे आता दरम्यानच्या मार्गावर वाहतूकीसाठी कोणत्याही प्रकारचा धोका नाही. दरम्यान यासंदर्भात देवेंद्र वेलिंगकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सध्यातरी कोसळलेली दरड पूर्णपणे हटविण्यात आलेली आहे. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलेला आहे. मात्र पावसाळी मोसमात पुन्हा एकदा सदर भागांमध्ये दरडी कोसळण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की प्राधान्याने याभागामध्ये लक्ष देण्यात येणार आहे .एरव्ही पावसाळय़ापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा बाजूला असलेल्या संभाव्य दरडीची माती साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र वनखात्याने याला आडकाठी निर्माण केल्यामुळे सदर काम बंद करावे लागले. ज्याभागामध्ये दरडी कोसळत आहेत त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वनखात्याची आडकाठी निर्माण होत असल्यामुळे सदर काम हाती घेणे शक्मय नसल्याचे वेलिंगकर यांनी यावळी स्पष्ट केले. तरीसुद्धा पावसाळय़ात दरड कोसळण्यास सुरुवात झाल्यास ताबडतोब त्या हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे वेलिंगकर त्यांनी सांगितले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सतर्कतेवर समाधान व्यक्त केले आहे. ताबडतोब यासंदर्भाची दखल घेऊन रस्त्यावर पसरलेली माती दूर केल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झाला आहे.

Related Stories

खाण पिठातील पाण्यापासून वीज निर्मिती होणार

Patil_p

मांद्रेतील जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध!

Amit Kulkarni

पर्जन्यराजाची गोव्याला शानदार सलामी!

Amit Kulkarni

किनारा व्यवस्थापन धोरण आखणार

Amit Kulkarni

जि.पं. निवडणूक 12 रोजी घेण्यावर एक‘मत’

Patil_p

आल्त दाबोळीतील हवाई मार्गातील एका घराविरूध्द प्रशासनाची कारवाई

Amit Kulkarni
error: Content is protected !!