Tarun Bharat

वाळवंटापासून कच्छच्या रणापर्यंत युद्धसराव

ऑपरेशन ‘दक्षिण शक्ती’ – शत्रूवर एकत्रितपणे हल्ला करणार तिन्ही संरक्षण दले

वृत्तसंस्था/ बिकानेर

भारतीय सैन्य स्वतःला एका नव्या स्वरुपात रुपांतरित करण्यासाठी सज्ज आहे. सैन्य आता थिएटर कमांड अंतर्गत काम करतेय. यात इंटीग्रेटेड बॅटल गुप्सला (आयबीजी) सामील केले जाईल. या बॅटल ग्रुप्समध्ये सैन्य, वायुदल आणि नौदल सामील असणार आहे. थिएटर कमांडच्या कॉम्बॅट रेडीनेस (युद्धसज्जता) क्षमतेचे परीक्षण करण्यासाठी थारच्या वाळवंटापासू कच्छच्या रणापर्यंत युद्धाभ्यास केला जात आहे. या युद्धाभ्यासाला ‘दक्षिण शक्ती’ नाव देण्यात आले आहे. सुमारे 500 किलोमीटरच्या कक्षेत सुरू असलेल्या या युद्धाभ्यासत सैन्याने स्वतःचे पूर्ण बळ झोकून दिले आहे.

दक्षिण शक्ती युद्धाभ्यासाच्या अंतर्गत सैन्याने रण ऑफ कच्च्छच्या दलदलयुक्त आणि सागरी भागांमध्ये स्वतःची क्षमता पारखून घेतली आहे. यात गुप्त माहिती जमा करणारे सर्व समूह म्हणजेच सैन्य, नौदल, वायुदलासोबत तटरक्षक दल, बीएसएफसह स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना सोबत घेत इंटेलिजेन्स ऑपरेशन्सचा सराव करण्यात आला. याचे मुख्य लक्ष्य सर्व सूत्रांना जोडत त्यांच्यातील ताळमेळ पडताळून पाहणे होते.

दक्षिण शक्ती युद्धाभ्यासाच्या माध्यमातून सैन्य बदलत्या स्थितीत युद्धक्षेत्राच्या नव्या पद्धती पडताळून पाहत आहे, जेणेकरून कमीत कमी कालावधीत प्रत्युत्तरादाखल हल्ला करत शत्रूला चकविण्यासह त्याच्या महत्त्वपूर्ण भूभागावर नियंत्रण मिळविण्याचा सराव सुरू आहे. हीच बाब समोर ठेवून युद्धाशी संबंधित सर्व गोष्टी हवाई, अंतराळ, सायबर, इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या क्षमतेचे परीक्षण करण्यात येतेय. या युद्धाभ्यासत देशातच विकसित लढाऊ हेलिकॉप्टरसह ड्रोनचा वापर केला जात आहे.

भविष्यातील युद्धासाठी तयारी

पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर पहिल्यांदाच सैन्य या नव्या पद्धती पडताळून पाहत आहे. आताचा युद्धाभ्यास यापूर्वी झालेल्या युद्धाभ्यासांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. भविष्यातील युद्ध, विशेषकरून आण्विक शक्तीने युक्त देशांदरम्यान मर्यादित कालावधीत मर्यादित क्षेत्रात लढले जाईल आणि त्यात अचूक आणि निर्णायक मारा करणाऱया सैन्य तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. अशाप्रकारच्या युद्धात पहिला वार करणाऱयाला लाभाची स्थिती प्राप्त होणार आहे. अशा युद्धात कोअर आणि डिव्हिजन प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत कमी पडू शकतात. याचमुळे थेट कमांडमध्ये ब्रिगेड आकारातील छोटे संयुक्त बॅटल ग्रूप तयार करण्यात आले आहेत.

स्थितीनुसार आयबीजीचा आकार

आयबीजीचा आकार कुठल्याही सैन्य ब्रिगेडपेक्षा मोठा आणि डिव्हिजनपेक्षा काहीसा कमी असेल. यात सामील अधिकारी. सैनिकांची संख्या क्षेत्रीय आणि मोहिमात्मक गरजांनुरुप निश्चित केली जाणार आहे. आयबीजीची धुरा मेजर जनरल स्तरीय अधिकाऱयाकडे असेल आणि तो संबंधित कोरच्या जीओसीच्या अधीन असणार आहे. आयबीजीमध्ये विविध क्षेत्रांमध्ये तरबेज सैनिक असतील.

Related Stories

बेल, गूळ, चुन्यातून साकारतेय मंदिर

Amit Kulkarni

लॉकडाऊननंतर ‘कोरोना’साठीकोणते धोरण राबविणार

Patil_p

व्हॉट्सऍपला टाकले टिकटॉकने मागे

tarunbharat

दिल्ली : मागील 24 तासात 91 नवे रुग्ण; 110 जणांना डिस्चार्ज 

Tousif Mujawar

भारतीय उच्चायुक्तांनी घेतली श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधानांची भेट

Abhijeet Khandekar

‘चोरांचा सरदार’ असणाऱया मंत्र्याचा राजीनामा

Patil_p