प्रतिनिधी/इस्लामपूर
लॉकडाऊन शिथिल झाला.जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबधित रुग्ण आढळून येत असल्याने भीती कायम आहे. इस्लामपूर व तालुक्यातील येलूर येथील एक युवती व महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.त्यामुळे प्रशासन व आरोग्य विभागाची दमछाक सुरुच आहे.
२६ वर्षीय युवती येलूर येथील आहे. यापूर्वी तिचे वडील पॉझिटिव्ह आले होते. ही युवती मुंबईहून आली आहे. ती मुंबई येथे नर्स म्हणून काम करीत आहे. या युवतीच्या घरातील आई व तीन बहिणींना येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान इस्लामपूर-राजारामनगर येथील एका ४१ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ही महिला पतीसह मुंबईहून गावी आली. पती व अन्य नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात सर्व्हे व अन्य उपाययोजना सुरु असल्याची माहिती वाळवा पंचायत समितीचे आरोग्य
अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी दिली.


previous post