वाळवा / वार्ताहर
वाळवा गावात १५ ऑगस्ट रोजी शनिवारी गावातील दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर १६ ऑगस्टला आणखी दोन पॉझिटिव्ह आल्यामुळे गावातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १५ झाली आहे. १५ पैकी ७ रूग्ण उपचारात आहेत, ८ रुग्ण बरे झाले आहेत. १५ ऑगस्ट रोजी सापडलेला रुग्ण कासेगांव पोलीस स्टेशन येथे पोलीस म्हणुन सेवा बजावत होते.
वाळव्याच्या सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहीर, मंडल अधिकारी बळी यादव, तलाठी साहेबराव सुदेवाड, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. वाळव्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी यांनी कोरोना बाबतच्या नियमांचे कठोर पालन करणेचे आवाहन केले आहे.


previous post