Tarun Bharat

वाळूत सामावत चाललेले गाव

Advertisements

भुतांच्या भीतीने लोकांचे पलायन

संयुक्त अरब अमिरातच्या अल मदाम या गावातील सर्व घरे हळूहळू वाळूत सामावली जात आहेत. येथील घरांच्या खोल्यादेखील वाळूने भरून गेल्या आहेत. असे का घडतेय याचे कुठलेच कारण समोर आलेले नाही. पण दुबईपासून सुमारे एक तासाच्या अंतरावरील या गावाला भूतांचे गाव म्हटले जाऊ लागले आहे. गाव ओस का पडले याबद्दल कुणालाच ठोस माहिती नाही. या गावात भूताचे वास्तव्य असल्याने लोकांनी एका रात्रीत पलायन केल्याचे परिसरातील अन्य गावांमधील लोक सांगतात.

चेटकिणीच्या सावटाने गावाची अशी स्थिती झाल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. मांजरासारखे डोळे असलेल्या चेटकिणीने पूर्ण गावच रिकामी करविले आहे. तर हे ओसाड गाव आता पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरू लागले आहे. जगभरातील पर्यटक दुबईमध्ये येतात, तेव्हा या गावाला आवर्जुन भेट देतात.

Related Stories

पाकिस्तानात पोहोचला नवा संकरावतार

Patil_p

पाक संसदेचे नियंत्रण तिसऱ्या शक्तीच्या हातात

Patil_p

अमेरिकेत कांद्यापासून पसरतोय सॅल्मोनेला बॅक्टेरिया; 400 लोक संक्रमित

datta jadhav

कोविशील्ड लसीने रोखले 80 टक्के मृत्यू!

Patil_p

जगातील सर्वात मोठा भोपळा

Amit Kulkarni

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला; तीन जणांचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!