Tarun Bharat

वाळू तस्करावर कारवाई, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर/प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेने मोहोळ तालुक्यातील शिंगोली येथे यारीद्वारे अवैध वाळू उपश्यावर कारवाई केली असून वाहनांसह सुमारे 21 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

लक्ष्मण उर्फ दादा शिवाजी खांडेकर (वय 38), तिरूपती नारायण हाके (वय 30, दोघे रा. शिंगोली), विवेक विठ्ठल गुंड (वय 23, रा. शिवणी, ता. उत्तर सोलापूर), संतोष ब्रम्हदेव आरकिले (वय 36, रा. शेगावदुमाला, ता. पंढरपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व त्यांच्या पथकाने शिंगोली येथे जावून खात्री केली असता, सदर ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशिन जोडून सिना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून वाळू उपसा पाँईंटची खात्री झाल्यानंतर तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळीर वाळू भरण्यासाठी पॉईंटवर आलेले वाहने व वाळू भरून निघण्याच्या तयारीत असताना काही इसमांना पोलिसांनी पकडले व काही इसम तेथून पळून गेले.

वाळू पॉईंटच्या ठिकाणाहून एक यारी मशिन संच, दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह, 10 ब्रास वाळूसाठा असा एकूण 21 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार संदीप काशिद, सचिन वाकडे, मोहन मनसावाले, हरीदास पांढरे, सुरज जाधव, दिलीप राऊत यांनी केली.

Related Stories

सोलापूर : बंद दुकानचे शटर तोडून ३२ हजार लंपास

Archana Banage

सोलापूर विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बॅकलॉगच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू होणार

Archana Banage

सोलापूर : निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी प्राधान्याने करा

Archana Banage

सोलापुरात मंगळवारी १३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर

Archana Banage

सोलापूर : मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याला निलंबित करा,अन्यथा आंदोलन

Archana Banage

करमाळ्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा आराखडा जाहीर

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!