Tarun Bharat

वाळू तस्करी-चोरटी दारू अड्डय़ावर धाड

खानापूर/   वार्ताहर

/ सर्वत्र लॉकडाऊन असताना तालुक्मयात चोरटी वाळू वाहतूक तस्करीला ऊत आला आहे याची खानापूर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन चोरटी वाहतूक करणाऱया टोपीनकटी येथील एका ट्रक्टर मालकासह ट्रक्टर ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच निटूर येथे गावठी दारू भट्टी तयार करून दारू विकणाऱया दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी दोघांना खानापुर पोलिसांनी अटक केली आहे.

खानापूर तालुक्मयात कोरोनाव्हायरस संदर्भात पोलिस प्रशासनाने सर्वत्र चोख बंदोबस्त केला असताना दुसरीकडे तालुक्मयातील काही वाळू तस्करी करणारे लोक चोरटी वाहतूक करून पोलिसांच्या डोळय़ात धूळफेक करून व्यवसाय करत असल्याचे वृत्त बुधवारच्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होताच खानापूर पोलीस उपनिरीक्षक बस गौडा पाटील यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई मोहीम हाती घेतली दरम्?यान तोपिंनकटी येथे चोरटी वाहतूक करणारा ट्रक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रक्टर मालक शंकर रामा होसुरकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

तसेच तालुक्मयातील निटुर गावात चोरटी गावठी दारू भट्टी तयार करून दारू विकणाऱया दोघांना खानापुर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आठ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपी शिवाजी नामदेव हंडी वय 40 तसेच भरमानी रामा नाईक वय 57 या दोघांना अटक करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Related Stories

शुभम साखे यांच्या सायकल प्रवासाला सुरुवात

Patil_p

बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

Omkar B

शुक्रवारी रुग्णसंख्येत घट, मृत्यूचा आकडाही घटला

Amit Kulkarni

अनमोड घाटात दरड कोसळली

Patil_p

बिस्वासांवर बेळगावकरांचा विश्वास!

Amit Kulkarni

बॅरिकेड्स कित्येक दिवस त्याचठिकाणी पडून

Omkar B