Tarun Bharat

वाळोली येथे विजेच्या धक्क्याने गंभीर वायरमनचा उपचारादरम्यान मृत्यू

वार्ताहर  / बाजारभोगाव

वाळोली ता.पन्हाळा येथे विद्युत ट्रान्सफाॕर्मरवर काम करीत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसून किरण भाऊ चव्हाण वय ३७ हे वायरमन  २७ जून रोजी गंभीर जखमी झाले होते.  त्यांच्यावर  कोल्हापूरात खासगी दवाखान्यात उपचार सुरू आसताना आज त्यांचा दुर्दैवी  मृत्यू झाला.

चव्हाणवाडी (ता. पन्हाळा) येथील किरण भाऊ चव्हाण महापारेषणच्या  कळे येथील वीज कार्यालय  अंतर्गत लाईन हेल्फर तथा वायरमन म्हणून वाळोली येथे  कार्यरत  होते.  गेल्या तेरा वर्षापासून ते नागरिकांना चांगली सेवा देत होते. गावात त्यांचा केबल व्यवसायही आहे.  सध्या वाळोली गावात भात रोप लागण सुरू आहे. शनिवारी २७ जून रोजी  सकाळी दहा पर्यत  कृषी पंपास वीज पुरवठा सुरू असतो. येथे पाण्याच्या  टाकीशेजारी असणाऱ्या म्हामुलकर डीपी वर तांत्रिक बिघाड झाल्याने  कृषी पंपास विद्युत पुरवठा होत नव्हता. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून बिघाड काढण्यासाठी म्हणून सकाळी आठ वाजता आले होते. त्यांनी कळे येथून कार्यालयात परमीट तथा परवानगी घेवून विद्युत प्रवाह बंद करून घेतला. पण  काम करत असताना साडेआठ च्या सुमारास  अचानक विद्युत प्रवाह चालू झालेने विजेचा जोराचा धक्का बसलेमुळे ते गंभीर जखमी झाले होते. यामध्ये त्यांच्या उजव्या हाताला व डाव्या पायाला भाजून मोठी जखम झाली होती.

कोल्हापूरात  खाजगी दवाखान्यात उपचार चालू होते. उपचार सुरू असतानाच दहाव्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. चव्हाणवाडी येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे , आई वडील , भाऊ असा परिवार आहे. घरचा करता पुरूषच गेल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महापारेषणने या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वीज पुरवठा सुरू कुणी केला ?

ज्या ट्रान्सफॉर्मरवर काम करायचे होते .त्या आधी कळे येथील कार्यालयातील परवानगी घेतली होती. यालाच परमीट घेणे म्हणतात. पण तरीही कुणी हलगर्जीपणात वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे आज एका तरूण वायरमनला जीव गमवावा लागला. हा वीजपुरवठा अचानक कसा काय सुरू झाला ? याचा शोध घेण्याची गरज आहे. 

Related Stories

हद्दवाढ समर्थक व विरोधक एकत्र येणार

Archana Banage

वरुणराजाच्या साक्षीने बाप्पांना निरोप

Patil_p

कोल्हापूर : कणेरीवाडीत शाळा सुशोभीकरण करण्याचा श्री गणेशा

Archana Banage

‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ उपक्रम राबवणार

Archana Banage

‘शिवभोजन’ द्यायचे कसे? चार महिने अनुदान नाही

Kalyani Amanagi

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा खुले

Archana Banage