Tarun Bharat

वासिम जाफर रणजी स्पर्धेतील पहिला ‘बारा हजारी’ मनसबदार

वृत्तसंस्था/ नागपूर

विदर्भचा फलंदाज वासिम जाफर हा रणजी करंडक स्पर्धेत 12 हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज बनला आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी स्पर्धेत केरळविरुद्ध खेळताना त्याने हा माईलस्टोन गाठला आहे.

या सामन्यात संघाचा 4 धावा असताना विदर्भने पहिला गडी गमविल्यानंतर जाफर मैदानात उतरला होता. त्याने याआधी मुंबई संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. 2019-20 मोसम सुरू होण्याआधी जाफरने 11775 धावा जमविल्या होत्या. याच मोसमात त्याने 150 रणजी सामने खेळण्याची ऐतिहासिक कामगिरीही नोंदवली. तो आता सर्वाधिक रणजी सामने खेळणारा फलंदाज बनला आहे. 1996-97 मध्ये त्याने प्रथमश्रेणीमध्ये पदार्पण पेले आणि देशी क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक होण्यापर्यंत मजल मारली. त्याच्या या कामगिरीने राष्ट्रीय संघातही त्याला स्थान मिळाले होते. त्याने 31 कसोटी व 2 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने भारतातर्फे शेवटचा सामना खेळला होता.

Related Stories

रियल माद्रीदचे दोन फुटबॉलपटू कोरोना बाधित

Patil_p

भारत-द. आफ्रिका यांच्यात आज ‘व्हर्च्युअल क्वॉर्टरफायनल’

Patil_p

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी जेमीसन न्यूझीलंड संघात

tarunbharat

बार्टीला पराभवाचा धक्का

Patil_p

कोरोनामुळे डब्लीन मॅरेथॉन रद्द

Patil_p

सात्विक-चिराग उपउपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni