Tarun Bharat

वासुदेव परब यांना प्रथम स्मृतिदिना निमित्त आंबेगाव वासियांची श्रद्धांजली

Advertisements

परब यांनी आंबेगावासाठी दिलेले योगदान आंबेगाववासियांच्या कायम स्मरणात राहणार

 ओटवणे प्रतिनिधी:

      वासुदेव परब यांनी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व क्रीडा क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले. आंबेगावासाठी त्यांचे हे योगदान आंबेगाव वासियांच्या कायम स्मरणात राहणार असून त्यांचे हे कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन आंबेगाव माजी सरपंच नामदेव परब यांनी केले. आंबेगाव येथील माजी सरपंच कै. वासुदेव परब यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आंबेगाव वासियांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात नामदेव परब बोलत होते. यावेळी देवस्थान मानकरी तथा वासुदेव परब यांचे बंधू ज्ञानेश्वर परब, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम राऊळ, अशोक शिंदे, विलास राणे, प्रदीप परब, अण्णा केळुसकर, योगेश गवळी, दाजी तेली, बाळकृष्ण गवळी, संतोष राणे, बाबुराव सावंत, भिवाजी नाईक, शशिकांत परब, सखाराम कुंभार, गणेश कुंभार, विलास सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कै वासुदेव परब यांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक कुटुंबाला गणेश पूजा सामानाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही कै. वासुदेव परब यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Related Stories

वेंगुर्ले तालुक्यात लाखाची हानी

NIKHIL_N

कोरोना रुग्णांसाठी 1200 बेड उपलब्ध

NIKHIL_N

दापोलीत तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू

Patil_p

संपकरी एसटी कर्मचाऱयांवर एकाच दिवशी मोठी कारवाई

Patil_p

विशाल कडणेच्या कामाची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् कडून दखल

NIKHIL_N

अखेरच्या श्रावण सोमवारीही मंदिरे बंद

Patil_p
error: Content is protected !!