Tarun Bharat

वास्कोच्या नगरसेविकेचा सातोसे येथे सत्कार

वार्ताहर /सातार्डा

सातर्डा गावच्या सुकन्या व वास्को-गोव्याच्या नगरसेविका सौ. मंजुषा पिळणकर यांचा सातोसे ग्रामस्थ व माऊली क्रिकेट क्लबतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. गणेशमूर्ती, शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.   

घरच्या सत्काराने आपण भारावून गेलो आहे. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर माझे अनेक सत्कार झाले. मात्र, घरच्या माणसांकडून झालेला हा सत्कार कायम स्मरणात राहणारा व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आपल्या कार्याला प्रेरणा देणारा आहे. माझ्याकडून गावासाठी जेवढे सहकार्य करता येईल, तेवढे निश्चितच करेन, अशी ग्वाही याप्रसंगी सौ. पिळणकर यांनी दिली. यावेळी सातोसे सरपंच बबन सातोसकर, बांदा सरपंच अक्रम खान, बांदा ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, माजी क्रिकेटपटू बाबा गाड, ज्ञानेश्वर सावंत, सातोसे देवस्थान समिती अध्यक्ष वसंत धरी, खजिनदार शशिकांत मांजरेकर, उपसरपंच सौ. पूजा मांजरेकर, एकनाथ भगत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, बांदा भाजप मंडल अध्यक्ष ज्ञानदीप राऊळ, सौ. पिळणकर यांच्या भगिनी तनुजा गडेकर, ग्रामपंचायत सदस्य शेखर मयेकर, ज्येष्ठ ग्रामस्थ मोहन नागवेकर आदी उपस्थित होते.

Related Stories

पक्ष हितापेक्षा म्हादईचे हित सर्वोच्च

Amit Kulkarni

पॅरा टिचर, स्वातंत्र्यसैनिक मुलांच्या संघटनेतर्फे निदर्शने

Amit Kulkarni

फोंडा पोलीस स्थानकात कोरोनानंतर डेंग्यूचे रूग्ण वाढले

Patil_p

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ फोंडय़ात 5 रोजी भव्य रॅली

Patil_p

चतुर्थी सणासाठी पेडणेतील जनता सज्ज , महागाई आणि कोरोना संकटातही गणेश भक्तांचा उत्साहाला उधाण , उत्सवावर पावसाचे सावट

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयात पोझीटिव्ह रुग्णाची संख्या 14 झाल्याने भयग्रस्त वातावरण

Patil_p