Tarun Bharat

वास्कोतील टुरिष्ट हॉस्टेलमध्ये राजस्थानी ग्रामीण मेळा

प्रतिनिधी /वास्को

वास्को शहरातील टुरीस्ट हॉस्टेलच्या आवारात राजस्थानी ग्रामीण मेळा प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी मुरगांवचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक दीपक नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष श्रद्धा महाले, नगरसेविका देविता आरोलकर, आयोजक राजस्थान आर्टस् ऍण्ड क्राफ्ट एक्झीबीशनचे महावीर जैन व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर प्रदर्शन दि. 20 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजेपपर्यंत सर्वांसाठी खुले असेल.

सदर प्रदर्शनात देशातील विविध राज्यातील कलाकारांच्या कलाकृतीचे दर्शन या  घडविण्यात आले आहे. या राजस्थानी ग्रामीण मेळा व प्रदर्शनात विविध दालने उभारण्यात आलेली आहेत. विविध प्रकारच्या घरगुती व पारंपरीक वस्तू, हस्तकला, राजस्थान ज्युवेलरी, जेम व गोल्ड प्लेटींग, लखनऊ सेलकन कार्विंग, राजस्थानी व उत्तप्रदेश बेड रगस्, कलमकारी साडय़ा व फॅबरीक्स, इयरींग व कुर्ता, बंगाली कॉटन साडय़ा, ड्रेस, मुलमुल, चंदेरी, पश्चिम बंगाल, मधुराई सुंगुडी, लेडीज टॉप्स व इतर कपडे उपलब्ध करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन 20 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

Related Stories

मुरगाव हार्बर येथील चौगुले हाऊसजवळील दरड कोसळली

Amit Kulkarni

शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानच्या महाब्रह्मरथाची उद्या भू-स्पर्श पूजा

Amit Kulkarni

पाटणेकरांची नाराजी भाजपला भोवणार

Patil_p

पेट्रोलपंपवर धांगडधिंगाप्रकरणी एकाला अटक

Amit Kulkarni

बेतोडा येथे जीपगाडीचा पाठलाग करीत दोन लाखाचा गांजा जप्त

Amit Kulkarni

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात

Amit Kulkarni