Tarun Bharat

वास्कोतील तेरा तबलीगी चेन्नईचे

दिल्लीतील संमेलनाशी संबंध नसल्याचे उघड

प्रतिनिधी/ वास्को

वास्कोतील एका गल्लीमध्ये आढळून आलेले तबलीगी मुस्लीम चेन्नईचे असून त्यांचा  दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगी संमेलनाशी संबंध नसल्याचे उघडकीस आले आहे. अद्याप त्यांचे वास्तव्य वास्कोतच असून आपल्या गावाकडे निघण्यासाठी सोय करण्याची मागणी त्यांनी उपजिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलीगी संमेलनाने कोरोनाच्या संकटात अधिकच भर घातल्याने देशभर प्रचंड भिती पसरली. गोव्यातही त्यांचे सदस्य असण्याची शक्यता बळावल्याने स्थानिक पोलिसांनी शोध घेण्यास प्रारंभ केला होता. यावेळी वास्को मांगोरहिल येथील एका मस्जीदीमध्ये या जमातीचे 13 लोक वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी चौकशी केली असता, ते तबलीक जमातीतीलच असल्याचे आढळून आले. मात्र, त्यांचा दिल्लीतील त्या संमेलनाशी काही संबध नव्हता.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांगोरहिलच्या त्या गल्लीत सापडलेले तबलीगी जमातीचे 13 सदस्य तामिळनाडू राज्यातील चेन्नईचे आहे. देशभर टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वी ते रत्नागीरीला अशाच एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. माघारी चेन्नाईला जाण्यासाठी ते मडगावमध्ये आले होते. मात्र, त्यांना रेल्वे चुकली. त्यामुळे त्यांना थांबावे लागले. तोपर्यंत लॉकडाऊन जाहीर झाल्याने त्यांनी मडगावच्या या जमातीच्या मशिदीत आश्रय घेतला. त्यानंतर ते वास्को बायणातील मशिदीत आले. हल्लीच ते मांगोरहिल येथील मशिदीत आश्रयाला आलेले होते. दिल्लीतील संमलेनाच्या कल्लोळानंतर झालेल्या घडामोडीत ते पोलिसांच्या हाती लागल्याने त्यांच्याबाबत संशय पसरला. मात्र, त्यांचा त्या संमेलनाशी संबंध नसल्याचे उघड झालेले आहे. त्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची शक्यता नसल्याने त्यांना कॉरन्टाईन वैगरे करण्यात आलेले नाही. आता त्यांनी चेन्नाईला परत जाण्यासाठी सोय करण्याची मागणी उपजिल्हाधिकाऱयांकडे केलेल्या अर्जात केली आहे.

Related Stories

नगर्से येथील तळय़ातून उपसलेला गाळ शेतजमिनीत

Omkar B

पाच पालिकांचे भवितव्य लटकतेच

Amit Kulkarni

मुख्यमंत्री सावंत आज उत्तराखंडला जाणार

Amit Kulkarni

भाजपने पणजीत ‘दलबदलू’ व्यक्तीला उमेदवारी दिली; उत्पल पर्रिकर यांची भाजपवर टीका

Archana Banage

मांदेत माळरानाला आग लावल्याने हजारो झाडांची हानी

Amit Kulkarni

महाराष्ट्र सरकारचे वाढत्या कोरोना काळात कडक निर्बंध

Amit Kulkarni
error: Content is protected !!