Tarun Bharat

वास्कोत भाजपापासून दुरावलेल्यांचा पक्षात पुन्हा प्रवेश, सदानंद शेट तानावडे यांनी केले स्वागत

प्रतिनिधी /वास्को

भाजपा गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी वास्को मतदारसंघाचा दौरा केला. त्यांच्या दौऱयाचे औचित्त साधून वास्कोतील काही प्रमुख कार्यकर्ते व समाजसेवकांनी भाजपात प्रवेश केला. सकाळी सदानंद शेट तानावडे यांचे वास्कोतील कदंब स्थानक व दामोदर मंदिरासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताषांनी जोरदार स्वागत केले.

वास्कोतील दौऱयात भाजपा प्रदेश अध्यक्षांनी सकाळपासून रात्रीपर्यंत वास्कोतील विविध सामाजीक गट, व्यवसायीक गट, समाजसेवक, पक्षाचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरीकांच्याही भेटी घेतल्या व त्यांच्याशी चर्चा केली. प्रदेश अध्यक्ष बुधवारी रात्री उशिरापर्यंत वास्कोत होते. रात्री त्यांनी शहरातील हॉटेल लापाझमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सदानंद शेट तानावडे यांच्या समवेत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आमदार कार्लुस आल्मेदाही भ्रमंतीवर होते. मुरगावच्या उपनगराध्यक्षा श्रध्दा महाले, नगरसेवक दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, फॅड्रीक हेन्रीक्स, दिलीप बोरकर, मातियास (मोती) मोंतेरो, अमेय चोपडेकर, नगरसेविका देविता आरोलकर, जयंत जाधव, संदीप नार्वेकर व इतर प्रमुख कार्यकर्त्यांचीही तानावडे यांना सोबत लाभली.

संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे यांनी वास्कोतील दौऱयाविषयी माहिती दिली. भाजपाची संघटनात्मक ताकद वास्कोत बळकट असून संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजप वास्कोत सतत तिसऱयांदा विजय प्राप्त करेल असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांची वास्कोत जय्यत तयारी दिसत आहे. चांगले वातावरण कार्यकर्त्यांनी तयार केलेले आहे. यापूर्वी पालिका निवडणुकीतही मुरगावच्या तिन्ही मतदारसंघात भाजपा समर्थक उमेदवारांनी यश प्राप्त केले होते. ती निवडणुक लढवलेले अनेक जण आज भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. यात अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांचाही समावेश आहे असे तानावडे म्हणाले. उर्वरीत गोव्या प्रमाणेच वास्कोतही विषेशता युवा कार्यकर्त्यांचा आणि महिला वर्गाचा भाजपाला प्रमाणात पाठींबा असून असा पाठीबा मिळवणारा भाजपा एकमेव पक्ष आहे असे तानावडे म्हणाले. पक्षाबाहेरील एखादी व्यक्ती आपल्याला भाजपाची उमेदवारी मिळेल असा दावा करीत असल्यास ते त्याचे वयक्तीक मत असू शकते. अशा दाव्यांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले की, यापूर्वी वास्कोत भाजपाने दुसऱयांदा विजय प्राप्त करून विक्रम केला होता. आता तिसऱयांदा हेट्रीक साध्य करण्याचा विक्रम करणार आहे. भाजपाच्याच अनेक कार्यकर्त्यांनी पालिका निवडणुक लढवली होती. पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर नव्हत्या. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र निवडणुक लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी अनेक जण पुन्हा भाजपात दाखल झालेले आहेत. त्यामुळे भाजपा वास्कोत पूर्णपणे सशक्त असल्याचे आमदार आल्मेदा म्हणाले. भाजपात प्रवेश केलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे प्रदेश अध्यक्ष तानावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Related Stories

बीपीएड-बीएड पदव्यांना समान दर्जा अधिसूचित

Amit Kulkarni

कुठ्ठाळी मतदारसंघातील समस्यां सोडवण्यासाठी मंत्री माविन गुदिन्हो यांची शासकीय अधिकाऱयांसमवेत उपासनगरात बैठक

Amit Kulkarni

सरकारकडून सत्तरीतील शेतकऱयांची थट्टा

Amit Kulkarni

सोलर फेरीबोटीचा फ्लोटरमुळे चोडणवासियांसमोर संकट

Patil_p

राज्यात अमृतमहोत्सवी वर्षात 75 उद्योग येणार

Omkar B

पेडणे पोलिसांनी अमली प्रदार्थ बाळगल्या प्रकरणी चेन्नई येथील नागरिकाला दीड लाख रुपये किंमतीच्या अमली प्रदार्थासह ताब्यात घेत केला गुन्हा नोंद

Amit Kulkarni