Tarun Bharat

वास्कोत महालक्ष्मी पुजनोत्सवात महालक्ष्मीच्या अंगावरील सुवर्णलंकार चोरीस

प्रतिनिधी/ वास्को

मुरगाव हिंदु समाजाच्या श्री महालक्ष्मी पुजनोत्सवात लक्ष्मीच्या अंगावरील सुमारे चार लाखांचे सोन्याचे अलंकार गायब होण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.  या घटनेमुळे शनिवारी वास्कोत श्री महालक्ष्मीच्या भाविकांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्येही खळबळ माजली. देवदर्शनाचा बहाणा करून आलेल्या एखादय़ा चोरटय़ाने हे कृत्त्य केल्याचा संशय आहे.

मुरगाव हिंदु समाजाच्या वास्को खारवीवाडा भागातील महालक्ष्मी पुजनोत्सवाला 67 वर्षांची पंरपरा असून या उत्सवाच्या आजपर्यंतच्या इतिहासात असा प्रकार कधी घडलेला नाही. काल शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ही धक्कादायक घटना  पुरोहिताच्या निदर्शनास आली. गेली सुमारे सात दशके साजरा करण्यात येणाऱया महालक्ष्मी पुजनोत्सवाच्या ठिकाणी सध्या मुरगाव हिंदु समाजातर्फे महालक्ष्मीचे मंदिर उभारण्यात येत आहे. त्यामुळे मंदिराबाहेर उभारण्यात आलेल्या मंडपात यंदा महालक्ष्मी पुजनोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काल शनिवारी या उत्सवातील तिसरा दिवस होता. उत्सवानिमित्त समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रात्री एक वाजेपर्यंत या मंडपात उपस्थित होते. दोन पोलीस तसेच खासगी सुरक्षा रक्षकही मंडपात तैनात होते. सकाळी सातच्या सुमारास पोलीस आपली डय़ुटी संपवून बाहेर पडले. मात्र, सुरक्षा रक्षक होता. महालक्ष्मीच्या अंगावरील सोन्याचे अलंकार चोरीस गेल्याचे त्या सुरक्षा रक्षकाच्याही लक्षात आले नाही. सकाळी आठच्या सुमारास धार्मिक विधी करण्यासाठी पुरोहित देवीकडे आले असता त्यांना महलक्ष्मीची मूर्ती जागेवरून हलल्याचे व मूर्तीच्या अंगावरील सोन्याचे अलंकार गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भाविकांमध्ये, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेची लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली.

महालक्ष्मी पुजनोत्सव समितीचे अध्यक्ष वासुदेव साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यासंबंधी पोलीस तक्रार करण्यात आलेली असून पोलीस सुरक्षा रक्षकाला सोबतीला घेऊन तपास करीत आहेत. ते म्हणाले की उत्सवानिमित्त देवीच्या अंगावर सुवर्ण अलंकार चढवण्यात आले होते. देवीच्या अंगावर बरेच अलंकार होते. मात्र, अज्ञात चोरांने सहज चोरणे शक्य झालेले देवीचे मंगळसुत्र आणि चपला हार पळवीला आहे. या सुवर्णलंकारांची किंमत सुमारे चार लाखांच्या घरात आहे. सकाळच्या वेळी पोलीस गेल्याची संधी साधून अज्ञात चोरटय़ाने देव दर्शनाच्या बहाण्याने हे कृत्त्य केले असण्याचा संशय आहे. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

2500 मतपत्रिका अवैध ठरवून नाकारण्याचा प्रकार

Amit Kulkarni

सांतईनेज येथे उद्या ‘सप्तसूर माझे’ कार्यक्रम

Amit Kulkarni

मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

Amit Kulkarni

शूटिंग स्पर्धेत युवराज, आदित्य, एल्ड्रिडा, साईनेश, अतुल, सिद्धार्थ, यश सुवर्णपदकांचे मानकरी

Amit Kulkarni

विजयाताईंना अखेरचा निरोप

Patil_p

शाळेत विद्यार्थी-शिक्षकांच्या उपस्थितीचा घेणार मागोवा

Amit Kulkarni