Tarun Bharat

वास्को भाजपाकडून स्वातंत्र्यसैनिक श्रीकांत धारगळकर यांचा सन्मान

प्रतिनिधी /वास्को

वास्को भाजपा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोवा मुक्तीदिनाच्या शष्टाब्दीपूर्तीनिमित्त वास्कोतील वयोवृध्ध्द स्वातंत्र्यसैनिक व समाज कार्यकर्ते श्रीकांत उर्फ आबा धारगळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. श्रीकांत धारगळकर हे वास्कोतील हयात असलेले एकमेव  स्वातंत्र्यसैनिक आहेत.

    मुरगावचे नगरसेवक दीपक नाईक, गिरीष बोरकर, अमेय चोपडेकर, वास्को रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव तसेच समाजसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी गोवा मुक्तीसाठी धारगळकर यांनी ऐन तारूण्यात केलेल्या त्यागाप्रती कृतज्ञाता व्यक्त करण्यासाठी वास्को भाजपा मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह भेट देऊन हा सन्मान करण्यात आला.

Related Stories

गोव्याला ड्रग्ज डेस्टिनेशन होऊ देणार नाही : मुख्यमंत्री

Patil_p

खरे फटिंग कोण याचे उत्तर जनतेला द्यावे

Patil_p

केंद्राकडून गोव्यात 22 हजार कोटींची विकासकामे

Amit Kulkarni

मिकी पाशेको यांचा राष्ट्रवादीला रामराम

Amit Kulkarni

वास्कोत दोन कार्यालये फोडून लाखभराची रोख लंपास

Omkar B

रावण सत्तरी भाजी उत्पादनात अग्रेसर

Patil_p