Tarun Bharat

वास्को येथे ऑन लाईन जुगारावर छापा

प्रतिनिधी/ पणजी

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी वास्को येथील ऑन लाईन जुगार अडय़ावर छापा मारून दोन संशयितांना अटक केली आहे. कॉम्युटर तसेच इतर जुगार साहित्य जप्त केले आहे. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या संशय़ितांमध्ये राधेशाम चव्हाण (51 रहाणारा डोंगरी वास्को), रामविनय चव्हाण (21 रहाणारा मारुती मंदीरा जवळ वास्को) यांचा समावेश आहे. वास्को येथील सिने वास्कोच्या मागे एका बंद खोलीत ऑन लाईन जुगार नियमित सुरु असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करून दोन्ही संशयितांना रंगेहात अटक करण्यात आली.

गेम ऑफ चान्स म्हणून बेकायदेशीर ऑन लाईन जुगार सुरु असतानाच संशयितांना अटक करण्यता आली. नंतर त्यांना सशर्थ जामीनावर सोडण्यात आले. गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक गिरीष पाडलोस्कर, हवालदार अशोक गावडे, कॉन्स्टेबल विनय सावंत व कल्पेश तोरस्कर यांनी ही कारवाई केली आहे. सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

काणकोणात सक्रिय रुग्णांची संख्या 57 वर

Amit Kulkarni

आधीच गर्दीचे ग्रहण, त्यात मोपमुळे वाढेल ताण!

Patil_p

‘तौक्ते’चा धोका टळला, जोरदार पाऊस

Patil_p

वीज ट्रान्सफॉर्मर आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश

Amit Kulkarni

म्हापसाचे अन्य तीन नगरसेवक भाजपात दाखल

Amit Kulkarni

सत्तरीत गावठी भाजीपाल्याच्या लागवडीला प्रोत्साहन

Amit Kulkarni