Tarun Bharat

वास्को रेल्वे स्थानकासमोर आता हायमास्ट ध्वजस्तंभ

Advertisements

प्रतिनिधी/ वास्को

दक्षिण पश्चीम रेल्वेने वास्को शहरातील जोशी चौकात तिरंग्यासाठी हायमास्ट ध्वजस्तंभ उभारण्याचे केलेले नियोजन पोलिसांनी रोखले. मात्र, संध्याकाळी पोलिस अधिकाऱयांशी झालेल्या चर्चेत हा प्रश्न मिटवण्यात आलेला असून आज बुधवारी पुन्हा ध्वजस्तंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

वास्को शहरातील रेल्वे स्थानकासमोर असलेल्या जोशी चौकात हायमास्ट दिव्यासह ध्वजस्तंभ उभारण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. पुण्याहून हा स्तंभ सोमवारीच वास्कोत दाखल झालेला असून हा स्तंभ उभारण्याचे काम काल मंगळवारी दिवसभरात पूर्ण होणार होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी हे काम रोखले. त्यामुळे रेल्वेच्या सहकार्याने हा स्तंभ उभारण्यासाठी कष्ट घेत असलेल्या शहर भागाचे नगरसेवक दाजी साळकर यांच्या पत्नी क्षमी साळकर, नगरसेविका रोचना बोरकर, गिरीष बोरकर व अन्य काही कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकावर धाव घेतली. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी संध्याकाळपर्यंत पोलीस स्थानकावरच ठाण मांडले. शेवटी त्यांनी पोलीस उपअधीक्षकांशी चर्चा केली. तक्रार कोणी केली होती हे मात्र उघड झालेले नाही. शेवटी पोलिसांनी ते काम रोखणार नसल्याचे स्पष्ट केल्याने हा प्रश्न सुटला. त्यामुळे आज बुधवारी सकाळपासून पुन्हा हायमास्ट दिव्यासह ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण होणार आहे.

यासंबंधी शहर भागाचे नगरसेवक दाजी साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हुबळी, बेळगाव शहरातील रेल्वे स्थानकासमोर हायमास्ट दिव्यांचे ध्वजस्तंभ रेल्वेने उभारलेले असून ते शहरात आकर्षण ठरत असल्यानेच आपणच रेल्वे विभागाला वास्कोत असा स्तंभ उभारण्याचा विनंती वजा प्रस्ताव दिला होता. रेल्वे स्थानकासमोरील जोशी चौकात हा स्तंभ उभारावा असे ठरले होते. जोशी चौक ही मुरगाव पालिकेची मालमत्ता असल्याने रेल्वेने मुरगाव पालिकेकडे त्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ही परवानगी मिळवण्यासाठी दिरंगाई होत होती. मात्र, ध्वजस्तंभ असल्याने नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी या कामासाठी संमती व सहकार्य केले होते. त्यामुळेच तो स्तंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते असे साळकर यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनीही आपण होकार दिला होता असे मान्य केले.

पालिकेच्या परवानगीवीना सहा लाखांचा हायमास्ट ध्वजस्तंभ

वास्को शहरातील या जोशी चौकात ध्वजस्तंभ उभारण्यासाठी रेल्वेतर्फे सहा लाख रूपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ध्वजस्तंभ उभारण्याचे कार्य चांगले असले तरी त्या जागेच्या मालकाची परवानगी न घेता रेल्वे विभागाने हे काम हाती घेतल्याबद्दल व रेल्वेने मुळ मालकाच्या ना हरकत दाखल्यावीना या खर्चाला मंजूरीही दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अज्ञात व्यक्तीने पोलिसांचे अशा प्रकारामुळेच या कामाकडे लक्ष वेधले असण्याची शक्यता आहे. मुरगाव पालिकेने हा ध्वजस्तंभ उभारण्याला परवानगी न दिल्यास तो बेकायदेशीर प्रकार ठरणार आहे. त्यामुळे पालिकेने आपली अधिकृत भुमीका ठरावाद्वारे ठरवण्याची गरज आहे.

Related Stories

फोंडा शहर सायंकाळनंतर सामसूम

Amit Kulkarni

संगीत हे शाश्वत, चिरकाल आनंद देणारे !

Patil_p

रेती काढण्यासाठी कायदेशीर परवाना केव्हा देणार

Patil_p

नाही तयारी, रंगरंगोटीही नाही… शिरगावात केवळ शांतता !

Omkar B

सरकारने नोकऱयांसाठी पैसे घेतल्याचे सिध्द करून दाखवा

Patil_p

वांते डोंगरकडा सत्तरी येथील रस्त्याचे काम अर्धवट बंद

Patil_p
error: Content is protected !!