Tarun Bharat

वास्को शहर व परीसरात कडक लॉकडाऊनमुळे शुकशुकाट

Advertisements

प्रतिनिधी / वास्को

वास्को शहर व परीसरात कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी संपूर्ण वास्को शहर व परीसरातही शुकशुकाट होता. प्रवासी वाहतुकही पूर्णपणे बंद होती. मुरगाव बंदरासह औद्योगिक आस्थापनांवरही लॉकडाऊनचा परीणाम झाला. राष्ट्रीयकृत बँकांचा व्यवहार मात्र खुला होता.

मार्चमध्ये झालेल्या एक दिवशीय जनता कर्फ्यूच्या दिवशी ज्या पध्दतीने वास्कोतील सर्व व्यवहार बंद राहिले तशा पध्दतीचा बंद राहिला. शहरातील आणि शहर परीसरात एकूण एक व्यवहार बंद राहिला. सर्व प्रकारची प्रवासी वाहतुकही बंद राहिली. त्यामुळे शहर परीसरात शुकशुकाट दिसून आला. वास्कोतील रस्त्यांवर खासगी वाहतुक फारच कमी प्रमाणात दिसून आली. लॉकडाऊनमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा मात्र सहभाग नव्हता. त्यांचे व्यवहार खुले होते. काही सहकारी बँकांही खुल्या होत्या. मात्र, या बँकांमध्ये ग्राहक फारसे फिरकले नाही. दिवसभर शहर व परीसर ओस राहिला. वास्कोतील हेडलॅण्ड सडा, नवेवाडे, बायणा, मांगोरहिल अशा सर्वच भागातील व्यवहार ठप्प होते. सकाळी लोकांना दुध व वर्तमान पत्रे सुरळीतपणे उपलब्ध झाली.

औद्योगिक क्षेत्रावरही परीणाम

औद्योगिक क्षेत्रात खासगी आस्थापने बंद होती. मुरगाव बंदरातील व्यवहार अत्यावश्यक सेवे पुरताच मर्यादीत होता. त्यामुळे कामगारांची किरकोळ उपस्थिती होती अशी माहिती एमपीटीच्या सुत्रांनी दिली. अत्यावश्यक सेवा कायदय़ाखाली झुआरी ऍग्रो केमिकल्सचे व्यवहार सुरळीत होते. त्याच बरोबर पहिल्या दिवशी गोवा शिपयार्डचा व्यवहारही सुरळीत राहिला. मात्र, लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे कामगारांच्या हजेरीवर थोडासा परीणाम झाला. राज्य प्रशासनाकडून गोवा शिपयार्डला लॉकडाऊनची अधिकृत सुचना न आल्याने शिपयार्ड व्यवस्थापनाने अद्याप लॉकडाऊन लागू केलेला नसल्याची माहिती गोवा शिपयार्डकडून मिळाली.

वास्कोत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी

वास्कोसह मुरगाव तालुक्यातील दाबोळी व कुठ्ठाळीतील आमदारांनी पूर्ण लॉकडाऊनची मागणी प्रारंभीच केली होती. तसेच पालिका व स्थानिक पंचायतीनीही लॉकडाऊनच्या मागणीचे समर्थन केले होते. वास्कोतील बऱयाच लोकांनाही लॉकडाऊन हवे होते. त्यामुळे गोव्यातील हा लॉकडाऊन वास्कोत गांभिर्याने पाळला जात असल्याचे दिसून येते. पुढील दोन दिवसही वास्कोत लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा तसेच मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत व काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनीही वास्कोत लॉकडाऊनचे दिवस वाढवण्याची मागणी केलेली आहे.

Related Stories

फोंडा उपजिल्हा इस्पितळातील डेटा एन्ट्री ऑपरेटर्स संपावर

Amit Kulkarni

‘आप’ची गोवा प्रदेश कार्यकारिणी बरखास्त

Amit Kulkarni

फातोर्डातील बंद केलेली कामे सुरू करण्यास 24 तासांची मुदत

Amit Kulkarni

फुटीर आमदारांची आज सभापतींसमोर सुनावणी

Amit Kulkarni

आजच्या युवा पिढीने शिवाजी महाराजांचा एक तरी गुण आत्मसात करावा

Patil_p

सांतईनेज येथे उद्या ‘सप्तसूर माझे’ कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!