Tarun Bharat

वाहतुकीच्या समस्येवर पोलिसांची अंधार भेदून पार पडली पनवेल संघर्षसोबत बैठक

Advertisements

नवी मुंबई/प्रतिनिधी

सायंकाळी साडेसातची वेळनवी मुंबईतील कोकण भवन, सामान्य प्रशासकीय इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित होतापुढचे दोन तास सर्वत्र अंधार पसरलेला. त्याच दरम्यान कर्नाळा खिंड ते तळोजे, कळंबोली ते खारघर, पळस्पे ते जुना पुणे रोड, नवीन पनवेल ते खांदा कॉलनी आणि पनवेलच्या काही भागात गंभीर बनलेल्या वाहतुकीच्या समस्येवर पनवेल संघर्ष समितीच्या मागणीनुसार काल गुरूवारी (ता. 02) वाहतुक खात्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त अरूण पाटील यांच्या दालनात सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोबाईल बॅटरीच्या प्रखर उजेडात विस्तृत चर्चा करत दीड तास बैठक रंगली होती.

मुंबईगोवा आणि मुंबई पुणे महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या कंटेनर यार्डातून भलेमोठे यमदूत वेडेवाकडे आकार घेत थेट महामार्गावर रेटत पुढे येत असल्याने दोन्ही मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यातच महामार्गावर अवजड वाहने, ट्रेलर (यमदूत) उभे करून ठेवण्यात येत असल्याने अपघात घडतात. त्याकरीता कंटेनर यार्डच्या मुख्य प्रवेशध्दारावर गतिरोधक बसविण्यावर बैठकीत सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी नवीन पनवेल वाहतुक खात्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मधुकर भटे यांना निर्देश देत नियमबाह्य उभ्या वाहनांवर कठोर कारवाईसह गतिरोधकांसाठी लेखी पत्र देण्यास बजावले आहे.

नौपाडा, कळंबोली आणि खांदा कॉलनीत उभे असणारे हजारो ट्रक, ट्रेलर आणि घातक रसायनाने भरलेले टँकर हटविण्याची मोहिम घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी अंकुश खेडकर यांना निर्देश दिले. त्याशिवाय वाहतुक कायदा 283 अंतर्गत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सुचित केले आहे. दररोज ही कारवाई सुरू राहिली पाहिजे, असे चव्हाण यांनी त्यांना सांगितले.

कळंबोली मॅकडोनाल्डसमोर खासगी प्रवासी वाहतुक बस सायंकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत नियमबाह्यरित्या थांबा निर्माण करून अपघातास निमंत्रण देत असल्याने त्यांच्यावर कारवाईचे सक्त आदेश दिले आहेत. त्यावर पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पर्यायी मार्गही निवडण्याचा विचार करण्यास सुचवले. कळंबोली अंतर्गत रस्त्यावर शिवसेना शाखा, मॅकडोनाल्ड ते वाहतुक पोलिस चौकी मार्गाचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी, त्यासाठी महापालिकेकडून अंतर्गत रस्त्याची दुरूस्ती करून घेण्यास सुचविले. त्यास चव्हाण, खेडकर यांनी सहमती दर्शविली. जेणेंकरून कळंबोलीहून घाट माथ्यावर प्रवास करणार्‍यांना सोयीस्कर पडेल.

पनवेल, नवी नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर आणि तळोजे परिसरातील शो रूम्स मालकांनी रस्ते काबिज केले असल्याने रहदारीस अडथळे निर्माण झाले आहेत. त्यांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कडू यांनी करताच, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वस्वी वरिष्ठ वाहतुक पोलिस अधिकारी अभिजित मोहिते (पनवेल), अंकुश खेडकर (कळंबोली), आनंद चव्हाण (खारघर), मधुकर भटे (नवीन पनवेल) आणि राजेंद्र आव्हाड (तळोजे) आदींना दिले.

सर्व शहरातील शाळा भरण्याच्या आणि सुट्टी होण्याच्या वेळेत वाहनांची वर्दळ होत असल्याने विद्यार्थ्यांना मोठा फटका सहन करावा लागतो. त्या काळात शाळेने सुरक्षा रक्षक पुरविणे गरजेचे असून शाळेपासून तीनशे मीटर अंतरावर सुरक्षा रक्षक नेमून वाहतुक नियंत्रण करण्याचे लेखी आदेश संबंधित सर्व शाळांना देण्यात यावेत, असे कडू यांनी सुचविताच, येत्या पंधरवड्यात सुरक्षा सप्ताह सुरू होत असून त्या धर्तीवर शाळा प्रशासनाची बैठक होईल. त्यावेळी हा मुद्दा त्यांच्याशी चर्चेतून सोडवता येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

Related Stories

12 मे पासून नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन!

Rohan_P

भाजपच्या ‘त्या’ टीकेला नितीन राऊतांचे प्रतिउत्तर

Abhijeet Shinde

फोन टॅपिंगसाठी रश्मी शुक्लांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा सवाल

Abhijeet Shinde

”सत्ताधीशांचा वसुलीचा नादखुळा, नेमेची येतो पावसाळा अन् ५ वर्षात १ हजार कोटींचा घोटाळा”

Abhijeet Shinde

यूपीएससी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख पार

Rohan_P
error: Content is protected !!