Tarun Bharat

वाहतूक दक्षिण पोलिसांच्या कारभाराची चौकशी सुरू

पोलीस दलात खळबळ, पोलीस आयुक्तांना देणार अहवाल

प्रतिनिधी/ बेळगाव

वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकातील संशयास्पद कारभाराची चौकशी सुरू झाली आहे. वाहतूक विभागाच्या एसीपींनी चौकशी सुरू केली असून लवकरच या संबंधी वरि÷ अधिकाऱयांना अहवाल देण्यात येणार आहे. चौकशीत या गैरकारभारावर पांघरुन घालणार की सत्य परिस्थिती उघडकीस आणणार याकडे  बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

वरि÷ अधिकाऱयांना आलेल्या एका निनावी पत्रामुळे वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात भ्रष्टाचार व गैरकारभार उघडकीस आला होता. पोलीस उपायुक्तांच्या सुचनेवरुन वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा यांनी चौकशी हाती घेतली असून वाहतूक पोलीस स्थानकात भेट देवून त्यांनी तेथील पोलिसांकडून माहिती घेतली आहे.

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा 17 जानेवारी रोजी बेळगाव दौऱयावर येणार आहेत. त्यामुळे बहुतेक अधिकारी बंदोबस्ताच्या तयारीत आहेत. अमित शहा यांच्या बेळगाव दौऱयानंतर या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळणार असून त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन व उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.

गोवा व महाराष्ट्रातून बेळगावला येणारी वाहने अडवून वाहन चालकांची कशी लुट केली जाते या विषयी स्वतः वाहतूक पोलिसांनीच आपल्या वरि÷ अधिकाऱयांचे नीनावी पत्राव्दारे लक्ष वेधले असून या संपूर्ण गैरकारभाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सोमवार दि. 11 जानेवारी रोजी ‘वाहतूक दक्षिण पोलीस स्थानकाचा कारभार संशयास्पद’ या मथळय़ाखाली तरुण भारतने वृत्त प्रसिध्द करताच पोलीस दलात खळबळ माजली आहे. आता पोलिसांनीच पोलिसांचा गैरकारभार चौव्हाटय़ावर आणल्याने या प्रकरणाला महत्व प्राप्त झाले आहे. पोलीस आयुक्त कोणती भूमिका घेणार याकडे बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

अखेर बसस्थानकाचा ताबा कॅन्टोन्मेंटकडे

Amit Kulkarni

क्वारंटाईनमधून 121 जणांना केले मुक्त

Patil_p

मंगळवारी ग्राम पंचायतीसाठी 244 अर्ज दाखल

Patil_p

परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Omkar B

नरगुंदकर भावे चौकात दररोज वाहतूक कोंडीची समस्या

Amit Kulkarni

राज्यात सुविधांयुक्त 75 रुग्णालये उभारणार

Omkar B