Tarun Bharat

वाहतूक नियंत्रणासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर भिंत

ऑनलाईन टीम / वेल्लोर : 

लॉकडाऊन काळात वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर वेल्लोर जिल्ह्यात दोन ठिकाणी चेक नाक्यावर 3 ते 7 फुटांच्या भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारची देशातील ही पहिलीच घटना आहे.
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य राज्यातील वाहनांना वेल्लोरमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. वेल्लोरमधील सैनागुंता व पोन्नई या दोन ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चेक नाक्यांवर भिंती उभारण्याचे काम रविवारी सकाळपासून सुरू झाले आहे. पतथालपल्ली, परादारामी, सेरकाडू आदी चार ठिकाणचे तपासणी नाके मात्र, खुले ठेवण्यात आले असून, तेथून वाहनांना तमिळनाडूमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. या मार्गाने वेल्लोरमध्ये येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.

Related Stories

आसामच्या नामघरांना मदत, भाजपला लाभ

Patil_p

केरळची पुनरावृत्ती; कोल्ह्याला खायला घातले स्फोटके भरलेले मांस

datta jadhav

द्रमुक खासदार ए. राजांकडून वादग्रस्त विधान

Patil_p

पदवीपूर्व प्रवेशासाठी यंदा ‘सीयुसीईटी’ नाही

Patil_p

ब्राझील : मँडेट्टा यांची आरोग्यमंत्री पदावरून हकालपट्टी

prashant_c

सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली

Tousif Mujawar