Tarun Bharat

वाहतूक पोलीस हवालदाराचा हृदयाघाताने मृत्यू

पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी यांना पती वियोग

 प्रतिनिधी /बेळगाव

वाहतूक उत्तर विभागात सेवा बजावणारे पोलीस हवालदार संजीवकुमार बी. भंडारी (वय 37) यांचे बुधवारी सकाळी हृदयाघाताने निधन झाले. खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी येथे ही घटना घडली आहे.

एपीएमसीच्या पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी यांचे ते पती होत. संजीवकुमार हे मुळचे हुक्केरी तालुक्मयातील जाबापूर गावचे. 2005 मध्ये पोलीस दलात ते रुजू झाले होते. नोव्हेंबर 2019 पासून वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात हवालदार म्हणून ते सेवा बजावत होते.

सध्या ते दोन दिवस सुट्टीवर होते. खानापूर तालुक्मयातील हिरेहट्टीहोळी येथे गेले होते. याच ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. जाबापूर येथे सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या मनमिळावू पोलीस हवालदाराच्या निधनाने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

Related Stories

ज्येष्ट नागरिक पेन्शन योजनेत गोंधळ

Amit Kulkarni

आमदार बेनके यांची दूरदर्शननगरला भेट

Amit Kulkarni

किरकोळ भाजीपाला बाजारात टोमॅटो घसरला

Patil_p

वकिलांवरील हल्ल्यांविरोधात बार असोसिएशनचे निवेदन

Amit Kulkarni

जांबोटी-चोर्ला रस्ता डागडुजीला सुरुवात

Amit Kulkarni

संभाव्य पूर परिस्थितीसाठी आपत्ती निवारण पथक सज्ज

Amit Kulkarni