Tarun Bharat

वाहन उद्योगात चांदीची मागणी वाढणार

Advertisements

‘ सिल्वर ग्रोइंग रोल इन दी ऑटोमोबाईल इंडस्ट्री’ च्या अहवालात माहिती

वृत्तसंस्था/ मुंबई

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दिवसागणिक वेगाने वापरण्यात येणाऱया अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आगामी काही वर्षांमध्ये वाहन उद्योगामध्ये चांदीची मागणी तेजीने वाढत जाणार असल्याची माहिती आहे. यासोबतच एक ठराविक असेट क्लासच्या पातळीवर चांदीमधील गुंतवणुकीमधून सकारात्मक परतावा मिळण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

जागतिक पातळीवरील कन्सल्टन्सी फर्म सिल्वर इन्स्टिटय़ूटने ‘सिल्वर ग्रोइंग रोल इन दी ऑटोमोबाईल इंडस्ट्री’ नावाने एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये बॅटरीवर चालणाऱया इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसह ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये येणाऱया नवीन टेंडस्चे विश्लेषण केले गेले आहे. याच्या आधारे प्रत्येक हलक्या वाहनांमध्ये 15 ते 28 ग्रॅम चांदीचा वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये मिड-हायब्रिड वाहनांमध्ये जवळपास 20 टक्के आणि अधिक आणि पूर्ण हायब्रिड वाहनांमध्ये अधिकच्या चांदीचा वापर केला जातो. नजिकच्या काळात चांदीचा वापर वाढत जाण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

तंत्रज्ञान अन् अधिकची चांदीची विक्री

अहवालानुसार एक विशेष ट्रेंड सादर करण्यात येणार आहे, ज्यामध्ये आगामी काही वर्षाच्या प्रवासात वाहन क्षेत्रात चांदीची मागणी नियोजनबद्ध पद्धतीने वाढत जाण्याचे संकेत आहेत. आयसीई वाहनांच्या तुलनेत हायब्रिड वाहनांमध्ये चांदीचा वापर अधिक राहणार असल्याची नोंद या अहवालात आहे.

Related Stories

नवे सरकारी धोरण सहकारी बँकांना लाभदायकच

Omkar B

चहाची किंमत 60 टक्क्मयांनी वाढली

Patil_p

ब्रिटानियाची केनियाच्या केनाफ्रिक बिस्किटमध्ये हिस्सेदारी खरेदी

Patil_p

भारतीयांनी 14 हजार कोटींची केली बचत

Patil_p

अदानी समूहाने जिंकली होलसिमची बोली

Patil_p

वाहन उत्पादनाला येणार वेग

Patil_p
error: Content is protected !!