Tarun Bharat

वाहन धडकेत जखमी गाईला वाचवण्यात यश

प्रतिनिधी /बेळगाव

चारचाकी गाडीने एका गाईला धडक दिल्याने सदर गाय जखमी झाल्याची घटना कुमारस्वामी ले आऊट येथे धडक दि. 25 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

 गाय जखमी झाल्याने ती खाली कोसळली. तेथील लोकांनी त्या जखमी गाईचा जीव वाचवण्याचा खटाटोप सुरू केला. तेथून जात असलेला तुरमुरीच्या भक्तिकर महाराजांनी याबाबत पशू बचाव दलचे विनायक केसरकर यांना संपर्क साधला. ते लगेच हजर होत तेथील युवकांच्या सहाय्याने त्या गाईचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले. त्या गाईचे मालक देखील मिळाले. त्या गाईला सुरस्थित स्थळी पोहचेपर्यंत सकाळचे 5 वाजले.  विशेष म्हणजे त्या गाईचा अपघात झाला असता तेथे जवळपास 50 युवक जमले आणि प्रयत्न करू लागले.

  ज्या गाडीतून गाईला घेऊन जात होते, त्यातील अचानक इंधन संपले आणि रात्री 2 च्या सुमारास तब्बल 2 की. मी. चे अंतर युवकांनी गाडीला ढकलत नेले आणि गाईला वाचवले. एकंदरीत माणुसकीचा जणू पुनर्जन्मच झालाय, असे या घटनेतून निदर्शनास आले.

Related Stories

परीक्षांबाबत सरकारने योग्य तो खुलासा करावा : अभाविपची मागणी

Omkar B

लाच स्वीकारताना सहकार खात्याचा कर्मचारी एसीबीच्या जाळय़ात

Amit Kulkarni

कुदेमनीत शासकीय योजनांबाबत महिलांना मार्गदर्शन

Amit Kulkarni

साहित्य संमेलनाला महाराष्ट्राची परवानगी

Patil_p

हिजाबवरून शहरात गोंधळ सुरूच

Amit Kulkarni

तालुका स्तरावर कोरोना वॉररुमची स्थापना

Amit Kulkarni