Tarun Bharat

वाहन नोंदणीत ऑगस्टमध्ये 15 टक्क्यांची वाढ

पॅसेंजर वाहन निर्मात्यांचा मार्ग खडतर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

नव्या वाहन खरेदीसाठी नोंदणी महत्त्वाची असते, या नोंदणीत म्हणजे रेजिस्ट्रेशनमध्ये ऑगस्टमध्ये 15 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती फाडा या संघटनेने दिली आहे. फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन यांनी वाहनांच्या सर्व प्रकारात ऑगस्टमध्ये नोंदणीत वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. ही बाब वाहन उद्योगाला प्रगती साधण्यासाठी पुरेशी ठरलेली आहे. येत्या काळात या नोंदणीत आणखी वृद्धी होण्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत. दुचाकींच्या नोंदणीतही वाढ झाली आहे. 15 टक्के वाढ ही मागच्या वर्षाच्या ऑगस्टच्या तुलनेत नोंदली गेली आहे. मोटरसायकल व स्कूटर्सच्या नोंदणीचे प्रमाण वर्षानुसार पाहता 6 टक्के इतके अधिक दिसले आहे. सततची किमत वाढ व इंधन दरातील वाढ या कारणामुळे काहींनी वाहन खरेदी टाळली आहे. ग्राहक सध्याला खर्च करण्याऐवजी बचतीवर भर देत असल्याचेही फाडा संघटनेने म्हटले आहे. सध्याला शैक्षणिक संस्था सुरू होत असून विविध उद्योग, कारखाने पुन्हा सुरू झाल्याने येणाऱया काळात दुचाकींच्या मागणीला बहर येऊ शकतो, असेही फाडाने म्हटले आहे. पॅसेंजर वाहन निर्माते मात्र सेमीकंडक्टरच्या अपुऱया पुरवठय़ामुळे त्रस्त झाले आहेत. त्यांनी आपल्या वाहन निर्मिती संख्येत घट केली आहे.

Related Stories

वाहन विक्री जूनमध्ये 49 टक्क्मयांनी घटली

Patil_p

TATA कंपनीला बेलआउट पॅकेज देण्यास ब्रिटनचा नकार

datta jadhav

स्टार्टअप कंपन्यांची आयपीओसाठी लगबग

Patil_p

मोबाईल कंपन्यांचा चीनला झटका ?

Patil_p

देशातील तंत्रज्ञान उद्योगाची वाढ 2.3 टक्क्यांवर

Patil_p

‘अदानी’मध्ये उलथापालथ सुरुच

Patil_p