Tarun Bharat

वाहन विम्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

वाहनांचा विमा काढण्यासाठी आता पीयूसी (प्रदूषण नियंत्रण चाचणी) प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे. आयआरडीएने विमा कंपन्यांसाठी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच विमा कंपन्या आणि ग्राहकांना आदेश दिले होते की, वाहनाचे प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहन विम्याचे नूतनीकरण करू नये. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, असे आयआरडीएने म्हटले आहे. त्यामुळे विम्याच्या नुतनीकरणासाठी वाहन मालकाकडे पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने वाहनांना पीयूसी बंधनकारक केली आहे. त्यानुसार प्रत्येक वाहनधारकांने आपल्या वाहनाची प्रमाणित मानांकानुसार तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

Related Stories

एकाच चार्जवर 480 किलोमीटरचे मायलेज

Patil_p

मारुतीने डिझायर टूर कार्स परत मागविल्या

Patil_p

रेनॉची नवी क्वॉड दाखल

Patil_p

महिंद्रा स्कॉर्पियो-एनच्या बुकिंगला दमदार प्रतिसाद

Patil_p

बीएमडब्ल्यू 220 आय स्पोर्ट बाजारात

Amit Kulkarni

होंडाच्या नव्या अमेझचे बुकिंग सुरु

Patil_p
error: Content is protected !!