Tarun Bharat

विंडीजचा इंग्लंडवर कसोटी मालिका विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ सेंट जॉर्ज (ग्रेनेडा)

मालिकावीर व कर्णधार ब्रेथवेटच्या नेतृत्वाखाली यजमान विंडीजने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 1-0 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजने इंग्लंडचा 10 गडय़ांनी दणदणीत पराभव करून बोथम-रिचर्ड्स चषकावर आपले नाव कोरले.

या मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्याने या शेवटच्या निर्णायक कसोटीत दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करीत होते. या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांवर आटोपल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 297 धावा जमवित इंग्लंडवर 93 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर मेयर्सच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव 64.2 षटकांत 120 धावांत आटोपल्याने विंडीजला निर्णायक विजयासाठी केवळ 28 धावांची जरूरी होती. विंडीजने दुसऱया डावात 4.5 षटकांत बिनबाद 28 धावा जमवित ही शेवटची कसोटी 10 गडय़ांनी जिंकून मालिका हस्तगत केली. इंग्लंडने 8 बाद 103 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे दोन गडी 17 धावांची भर घालत तंबूत परतले. विंडीजच्या रॉचने वोक्सला 19 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर त्याने लीचला चार धावांवर बाद करून इंग्लंडला 120 धावांवर रोखले. विंडीजतर्फे मेयर्सने सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 18 धावांत 5 तर रॉचने 10 धावांत 2 आणि सिलेस व जोसेफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद पेला. विंडीजच्या दुसऱया डावात कर्णधार ब्रेथवेटने 21 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 20 तर कँपबेलने 8 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 6 धावा जमवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंड संघाने 2003-04 साली विंडीजचा कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव केला होता. त्यानंतर त्यांना विंडीजमध्ये मालिका जिंकता आलेली नाही.

संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड प. डाव 204, विंडीज प. डाव 297, इंग्लंड दु. डाव 64.2 षटकांत सर्वबाद 120 (लीस 31,. बेअरस्टो 22, वोक्स 19, मेयर्स 5-18, रॉच 2-10, सिलेस 1-26, जोसेफ 1-38), विंडीज दु. डाव 4.5 षटकांत बिन बाद 28 (क्रेग ब्रेथवेट नाबाद 20, कँपबेल नाबाद 6, अवांतर 2).

Related Stories

माजी ऑलिम्पियन्सना प्रशिक्षणासाठी निमंत्रण

Patil_p

केएल राहुलचे विदेशात सहावे खणखणीत शतक

Patil_p

अवनी लेखराला नव्या विश्वविक्रमासह सुवर्ण

Patil_p

विराटला वनडे नेतृत्वावरुन अर्धचंद्र, रोहित नवा ‘तारा’

Amit Kulkarni

झुलनची कमाल, स्मृतीची धमाल!

Patil_p

आनंदचा कार्लसनविरुद्ध आणखी एक विजय

Patil_p
error: Content is protected !!