Tarun Bharat

विंडीजचा ऑस्ट्रेलियावर 18 धावांनी विजय

वृत्तसंस्था/ सेंट लुसिया

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात विंडीजने ऑस्ट्रेलियाचा 18 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकांत 6 बाद 145 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा हाव 16 षटकांत 127 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने आपले शेवटचे सहा फलंदाज केवळ 19 धावांत गमविले.

विंडीजच्या डावात सलामीच्या सिमॉन्सने 27, आंद्रे रस्सेलने 51, हेटमेयरने 20 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया संघातील 38 वर्षीय वेगवान गोलंदाज  ख्रिस्टेनने विंडीजच्या फटकेबाजीवर नियंत्रण ठेवले होते. 2017 नंतर खिस्टेनचा ऑस्ट्रेलिया संघाकडून पहिला सामना होता. विंडीजचा सलामीचा फलंदाज लेवीस खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या हॅजलवूडने गेलला 4 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर त्याने रस्सेलचा बळी मिळविला. हॅजलवूडने 12 धावांत 3 गडी बाद केले. मार्शने 26 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यात दुखापतीमुळे कर्णधार पोलार्ड खेळू शकला नाही.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाची एकवेळ स्थिती 3 बाद 70 अशी होती. त्यावेळी ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकणार असे वाटत होते पण विंडीजच्या मॅकॉय आणि हेडन वॉल्श यांच्या भेदक माऱयासमोर ऑस्ट्रेलियाचे शेवटचे सहा फलंदाज केवळ 19 धावांत बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 16 षटकांत 127 धावांत आटोपला. विंडीजच्या मॅकॉयने 26 धावांत 4 तर वॉल्शने 23 धावांत 3 गडी बाद केले. मिचेल मार्शने 51 तर मॅथ्यू वेडने 33 धावा जमविल्या या सामन्यात विंडीजच्या मॅकॉयला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील दुसरा सामना ग्रॉस आयलेट येथे शनिवारी खेळविला जात आहे.

संक्षिप्त धावफलक

विंडीज 20 षटकांत 6 बाद 145 (रस्सेल 51, सिमॉन्स 27, हेटमेयर 20, हॅजलवूड 3-12, मिचेल मार्श 2-26), ऑस्ट्रेंलिया 16 षटकांत सर्वबाद 127 (मिचेल मार्श 51, मॅथ्यू वेड 33, मेकॉय 4-26, वॉल्श 3-23).

Related Stories

रियल माद्रिद संघात बेंझेमाचे पुनरागमन

Patil_p

सानिया मिर्झा दुहेरी, मिश्र दुहेरीच्या पुढील फेरीत

Patil_p

रिचर्डसनला ऑलिम्पिक हुकणार

Patil_p

विश्वचषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धा आजपासून

Patil_p

पोर्तुगालचा कॅन्सेलो कोरोना बाधित

Patil_p

24 वर्षांनंतर इंग्लंड प्रथमच अंतिम फेरीत

Patil_p