Tarun Bharat

विंडीजचा वनडे, टी-20 संघ जाहीर

वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स

बांगलादेशविरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 व वनडे मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडीज निवड समितीने संघाची घोषणा केली आहे.

टी-20 मालिकेसाठी रोव्हमन पॉवेल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेद मकॉयचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे. देव्हॉन थॉमस व अष्टपैलू कीमो पॉल यांचेही या संघात पुनरागमन झाले आहे. वनडे मालिकेसाठी डावखुरा स्पिनर गुडाकेश मोतीला पुनरागमनाची संधी मिळाली आहे. टी-20 सामने 2 व 3 जुलै रोजी डॉमिनिका येथे तर तिसरा सामना 7 जुलै रोजी गयानात होईल. वनडेतील सामने गयाना नॅशनल स्टेडियमवर 10, 13, 16 जुलै रोजी होतील.

विंडीज टी-20 संघ ः निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार),  ब्रूक्स, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काईल मेयर्स, मकॉय, कीमो पॉल, रोमारिओ शेफर्ड, ओडीयन स्मिथ, देव्हॉन थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर. राखील ः डॉमिनिक डेक्स

वनडे संघ ः पूरन (कर्णधार), शाय होप (उपकर्णधार), ब्रूक्स, केसी कार्टी, अकील हुसेन, जोसेफ, किंग, मेयर्स, गुडाकेश मोती, कीमो पॉल, अँडरसन फिलिप, रोव्हमन पॉवेल, जेडन सीलेस. राखीव ः रोमारिओ शेफर्ड.

Related Stories

मॅकॉनने एकाच ऑलिम्पिकमध्ये जिंकली 7 पदके!

Patil_p

बुमराहने कौंटीऐवजी विश्रांतीला प्राधान्य द्यावे : अक्रम

Patil_p

प्रज्नेश गुणेश्वरन दुसऱया फेरीत दाखल

Amit Kulkarni

उरुग्वेच्या चार फुटबॉलपटूंवर बंदी

Patil_p

वनडे मानांकनात भारताची तिसऱया स्थानी झेप

Patil_p

क्रीडामंत्र्यांच्या हस्ते नाडा ऍपचा शुभारंभ

Patil_p
error: Content is protected !!