Tarun Bharat

विंडीजचा सराव सामना : रेमन रिफेरचे 11 चेंडूत 5 बळी

Advertisements

लंडन : विंडीजचा क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये यापूर्वीच दाखल झाला आणि क्वारन्टाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. बुधवारी ओल्ड टॅफोर्ड मैदानावर सुरू असलेल्या सरावाच्या सामन्यात दुसऱया दिवशी विंडीजचा डावखुरा गोलंदाज रेमन रिफेरने 11 चेंडूत 5 बळी मिळविले.

हा सरावाचा सामना विंडीजच्याच दोन संघांत खेळविण्यात आला. एका संघाचे नेतृत्व क्रेग बेथवेटने तर दुसऱया संघाचे नेतृत्व कसोटी कर्णधार जेसन होल्डरने केले. बेथवेटच्या संघातून खेळताना 29 वर्षीय रिफेरने 11 चेंडूत 5 बळी मिळविले. यामुळे ब्रेथवेटच्या संघाला पहिल्या डावात 181 धावांची बढत मिळाली. होल्डरच्या संघाने 2 बाद 97 धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर रिफेरने बोनेर, दा सिल्वा, होल्डर यांना खाते उघडण्यापूर्वी बाद केले. त्यानंतर त्याने मोसले आणि कॉर्नवॉल यांचेही बळी मिळविले. होल्डर इलेव्हन संघाचा डाव 193 धावांत आटोपला. पहिल्या डावात होल्डर इलेव्हन संघ 82 धावांनी पिछाडीवर राहिला. दिवसअखेर ब्ा्रsथवेट इलेव्हन संघाने होल्डर इलेव्हन संघावर 181 धावांची आघाडी मिळविली आहे. सामन्याचा आणखी एक दिवस बाकी आहे.

 विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 8 जुलैपासून खेळविली जाणार आहे. कसोटी संघात स्थान मिळविण्यासाठी रीफेर प्रयत्नशील आहे. मात्र यासाठी त्याला अन्य गोलंदाजांशी चुरस करावी लागणार आहे. शॅनोन गॅब्रियल, अल्झारी जोसेफ, केमार रोश यांच्याशी त्याला स्पर्धा करावी लागणार असल्याने आपला दावा बळकट करण्यासाठी त्याला आणखी यश मिळवावे लागणार आहे.

Related Stories

क्रोएशियाचा रॅकिटिकची फुटबॉलमधून निवृत्ती

Patil_p

माजी फुटबॉलपटू चिन्मय चटर्जींचे निधन

Patil_p

अफगाण- पाक मालिकेच्या ठिकाणात बदल

Patil_p

महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Tousif Mujawar

ऍक्सेलसेनला धक्का देत लक्ष्य सेन अंतिम फेरीत

Patil_p

टी-20 विश्वचषकाचा फैसला पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!