Tarun Bharat

विंडीजविरुद्ध टी-20 साठी हॅरी ब्रूकचा इंग्लिश संघात समावेश

Advertisements

लंडन / वृत्तसंस्था

विंडीजविरुद्ध बार्बाडोस येथे होणाऱया टी-20 मालिकेसाठी हॅरी ब्रूकचा संघात समावेश करत असल्याची घोषणा इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने बुधवारी केली. यॉर्कशायरचा उजव्या हाताने फलंदाजी करणारा हॅरी ब्रूक येथे सॅम बिलिंग्ज दुखापतग्रस्त असल्याने 17 सदस्यीय संघात समाविष्ट असेल. ब्रूकने ऑस्ट्रेलियात इंग्लंड लायन्समधून तर बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स संघातून प्रतिनिधीत्व केले. आगामी टी-20 मालिकेसाठी इंग्लंडच्या प्रशिक्षण पथकात ऍन्थोनी मॅकग्रा (फलंदाजी प्रशिक्षक), ऍलन रिचर्डसन (जलद गोलंदाजी प्रशिक्षक), पॉल ट्वेडल (क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षण प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. इंग्लिश संघ विंडीज दौऱयासाठी शनिवारी बार्बाडोसला रवाना होईल. उभय संघातील 5 सामन्यांची मालिका दि. 22 ते 30 जानेवारी या कालावधीत खेळवली जाणार आहे.

Related Stories

एमसीएतर्फे सुनील गावसकर यांना अनोखी भेट

Patil_p

शेन वॉर्नला कोरोनाची बाधा

Patil_p

डुप्लांटिसचा पोल व्हॉल्टमध्ये विश्वविक्रम

Patil_p

पाक संघाचे इंग्लंडला प्रयाण

Patil_p

विंडीजची कसोटी मालिकेत विजयी सलामी

Patil_p

भारताने जिंकली वर्ल्डकपची ‘ड्रेस रिहर्सल’!

Patil_p
error: Content is protected !!