Tarun Bharat

विंडीज दौऱयासाठी पाक संघात नसीम, अब्बासचा समावेश

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

येत्या ऑगस्टमध्ये पाकचा क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी शुक्रवारी पाकच्या निवड समितीने संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज नसीम शहा आणि मोहम्मद अब्बास यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

चालूवर्षी झालेल्या न्यूझीलंडमधील दौऱयासाठी तसेच त्यानंतर पाकमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेत आणि झिंबाब्वेच्या दौऱयावर पाक निवड समितीने नसीम शहा आणि मोहम्मद अब्बास यांना वगळले होते. 32 वर्षीय नसीम शहाला या दौऱयापूर्वी आपली शरीरिक तंदुरूस्तीची चाचणी द्यावी लागेल, असे पाक निवड समिती प्रमुख मोहम्मद वासिम यांनी म्हटले आहे. गुडघ्याला झालेल्या दुखपतीमुळे नसीम शहाला दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या दुसऱया कसोटीतून माघार घ्यावी लागली होती.

पुढील महिन्यात पाकचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. इंग्लंडच्या दौऱयानंतर पाकचा संघ विंडीजला रवाना होईल. इंग्लंड दौऱयासाठी पाकने संघाची घोषणा केली असून नवोदित फलंदाज आझम खानला टी-20 संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकचा क्रिकेटचा विंडीजच्या दौऱयात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका उभय संघातील कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी जमैकाच्या सबिनापार्क मैदानावर खेळविली जाणार आहे.

वनडे संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, अब्दुल शफिक, फईम आश्रफ, फक्र झमान, हैदरअली, हॅरीस रॉफ, हॅरीस सोहेल, हसन अली, इमाम उल हक, मोहम्मद हेसनेन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा, सर्फराज अहमद, साद शकील, शाहीन आफ्रिदी आणि उस्मान कादीर.

 टी-20 संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, अर्शद इक्बाल, आझम खान, फईम आश्रफ, फक्र झमान, हैदरअली, हॅरीस रॉफ, हसन अली, इमाद वासीम, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हेसनेन, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम ज्युनियर, सर्फराज अहमद, शाहीन आफ्रिदी, शार्जिल खान आणि उस्मान कादीर.

कसोटी संघ- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, अब्दुला शफिक, अबीद अली, अझहर अली, फईम आश्रफ, फवाद अलम, हॅरीस रॉफ, हसन अली, इम्रान बट्ट, नौमन अली, साजीद खान, सर्फराज अहमद, साद शकील, शाहीन आफ्रिदी, शहनवाज देहाली, यासीर शहा आणि झहीद मेहमूद.

Related Stories

ऑस्ट्रेलियातील मदतनिधी सामन्यात लारा खेळणार

Patil_p

उज्ज्वल भविष्यासाठी पद्म पुरस्कार दीपस्तंभासमान

Patil_p

विंडीज मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा

Patil_p

न्यूझीलंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून

Omkar B

गुगलची पै.खाशाबा जाधवांना डुडलद्वारे मानवंदना

Patil_p

मुष्टीयुद्ध प्रमुख प्रशिक्षकपदी कुट्टाप्पा

Patil_p