Tarun Bharat

विंडीज-लंका कसोटी मालिका अनिर्णीत

Advertisements

वृत्तसंस्था/ अँटीग्वा

आयसीसी कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत खेळवली गेलेली यजमान विंडीज आणि लंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका शून्य बरोबरीत राहिली. मालिकेतील दुसरा सामनाही शेवटच्या दिवशी बरोबरीत संपन्न झाला. या मालिकेत लंकेच्या लकमलला ‘मालिकावीर’ तर विंडीजच्या कर्णधार क्रेग ब्रेथवेटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

 दुसऱया कसोटीत शुक्रवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी लंकेला विजयासाठी 347 धावांची जरूरी होती. बिनबाद 29 या धावसंख्येवरून लंकेने खेळाला पुढे सुरूवात केली. थिर्मेनी आणि कर्णधार करूणारत्ने या सलामीच्या जोडीने 38.3 षटकांत 101 धावांची शतकी भागिदारी केली. उपाहारापर्यंत लंकेने बिनबाद 93 धावा जमविल्या होत्या. पावसामुळे शेवटच्या दिवशीच्या खेळामध्ये अडथळा आला. डावातील 39 व्या षटकांत थिर्मेनी जोसेफच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 114 चेंडूत 39 धावा जमविल्या. त्यानंतर डावातील 56 व्या षटकांत कर्णधार करूणारत्ने मेयर्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. या मालिकेत कर्णधार करूणारत्नेने आपले पहिले अर्धशतक झळकविले. त्याने 176 चेंडूत 75 जमविल्या.

ओशॅदा फर्नांडो आणि चंडीमल यांनी तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 47 धावांची भर घातली. फर्नांडो 66 तर चंडीमल 10 धावावर नाबाद राहिले. लंकेने दुसऱया डावात 79 षटकांत 2 बाद 193 धावा जमवित ही कसोटी अनिर्णित राखली. विंडीजतर्फे जोसेफ आणि मेयर्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लंकन संघाच्या कामगिरीबाबत कर्णधार करूणारत्नेने समाधान व्यक्त केले.

संक्षिप्त धावफलक

विंडीज प. डाव सर्वबाद 354, लंका प. डाव सर्वबाद 258, विंडीज दु. डाव 4 बाद 280 डाव घोषित, लंका दु. डाव 79 षटकांत 2 बाद 193 (थिर्मेनी 39, करूणारत्ने 75, ओशॅदा फर्नांडो नाबाद 66, चंडीमल नाबाद 10, जोसेफ 1-33, मेयर्स 1-5).

Related Stories

गुजरातला हरवून उत्तर प्रदेश अंतिम फेरीत

Amit Kulkarni

ऍनीसिमोव्हाची विजयी सलामी

Patil_p

महिला बुद्धिबळपटू मेंडोका आघाडीवर

Patil_p

पाचव्या कसोटीसाठी मोहम्मद शमी तंदुरुस्त

Patil_p

न्यूझीलंड दौऱयासाठी राहुल द्रविडला विश्रांती

Patil_p

राजस्थान, सनरायजर्स यांना आज विजय आवश्यक

Omkar B
error: Content is protected !!