Tarun Bharat

विंडीज संघाच्या सराव शिबिराला प्रारंभ

Advertisements

वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट

विंडीज संघातील सर्व क्रिकेटपटू कोरोना चाचणीत निगेटिव्ह असल्याचे आढळून आल्याने आता हे सर्वजण आगामी दक्षिण आफ्रिकाविरूद्ध होणाऱया मायदेशातील मालिकेसाठी सराव शिबिरात दाखल झाले आहेत. विंडीजच्या 30 जणांची गुरूवारी कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते निगेटिव्ह असल्याचे आढळून आले.

गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी संघाच्या सराव शिबिराला प्रारंभ करण्यात आला. या शिबिरासाठी दोन गट पाडण्यात आले. प्रत्येक गटामध्ये 15 खेळाडूंचा समावेश असून या दोन्ही गटासाठी वेगळय़ा कालावधीत सराव करण्याची तरतूद करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिका संघाबरोबर होणाऱया या आगामी मालिकेसाठी विंडीज संघाकडून कसून सराव करून घेतला जाणार असल्याची माहिती संघाचे प्रमुख प्रशिक्षक फिल सिमॉन्स यांनी दिली. विंडीज संघाने अलिकडे म्हणजे गेल्या फेब्रुवारीत बांगलादेशचा त्यांच्या मायभूमीत 2-0 असा पराभव केला तर गेल्या मार्चमध्ये लंकाबरोबरची मालिका विंडीजने बरोबरीत सोडविली. सोमवारी विंडीजच्या खेळाडूंमध्ये सरावासाठी चार दिवसांचा सामना खेळविला जाणार आहे. विंडीज संघाचा आगामी उन्हाळी क्रिकेट हंगाम भरगच्च असून या कालावधीत विंडीज संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकच्या दौऱयावर जाणार आहे.

Related Stories

लिव्हरपूलची चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये धडक

Patil_p

गुजरातच्या मॅथ्यू वेडला ताकीद

Patil_p

हॅलेप, नदाल, किर्गीओस, गॅरिन उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

सूर्या बनला टी-20 मधील ‘नंबर वन’ फलंदाज

Patil_p

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

Amit Kulkarni

पंत-श्रेयस यांच्यात आजच्या सामन्यात चुरस

Patil_p
error: Content is protected !!