Tarun Bharat

विकासकामाचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणारी विकासकामे तातडीने पूर्ण करावीत. कामे पूर्ण करण्यासाठी बंधन घातले नाही. मात्र तुम्ही दिलेल्या वेळेत काम पूर्ण करून पुढील बैठकीत याची माहिती द्यावी, अशी सूचना मनपा प्रशासक जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला आढावा बैठक घेतली जाईल. त्यामुळे त्या वेळेत घेतलेल्या कामांची पूर्तता करा, असा आदेश प्रशासकांनी बजावला.

विकासकामाचा आढावा प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सोमवारी घेतला. यावेळी प्रथम कार्यालय आवारातील पुतळय़ाची पाहणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बैठकीवेळी उपस्थित अधिकाऱयांची ओळख परेड झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱया विकासकामाची माहिती जिल्हाधिकाऱयांनी घेतली. महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी मनपाच्यावतीने राबविण्यात येणाऱया कामांची माहिती दिली. 100 कोटी अनुदानांतर्गत राबविण्यात आलेल्या आणि राबविण्यात येणाऱया कामांची माहिती सादर केली. 100 कोटी अनुदानांतर्गत राबविण्यात येणारी विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना केली. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागेल याची माहिती घेऊन तुम्ही दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करा, अशी सूचना केली. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सतर्क राहण्याची सूचना अधिकाऱयांना केली.

सध्या 15 व्या वित्त आयोग अनुदानातून महापालिकेला निधी मंजूर झाला आहे. महापालिकेच्या वॉर्ड बजेटअंतर्गत विकासकामे राबविण्यात येतात. मात्र, विकासकामांचा कृती आराखडा अद्याप तयार करण्यात आला नाही. त्यामुळे सदर निधीचा विनियोग करण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना केली. महापालिकेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला बैठक घेतली जाईल. त्यावेळी केलेल्या सूचनांची पूर्तता करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश बजावला. इमारत बांधकाम परवाना, घरपट्टी वसुली व विविध कामकाजाची माहिती जिल्हाधिकाऱयांनी घेतली.

बैठकीला महापालिका आयुक्त जगदीश के. एच., अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, नगर योजना अधिकारी बसवराज हिरेमठ, आरोग्य अधिकारी बसवराज धबाडे, सामान्य प्रशासन उपायुक्त आदींसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

किणयेनजीक ट्रकमधील साहित्याची चोरी

Patil_p

शहापूर परिसरात संपूर्ण लॉकडाऊन

Patil_p

काडा कार्यालयासमोर गोंधळ सुरूच

Patil_p

येळ्ळूर फलक खटल्यात दोघांची साक्ष

Amit Kulkarni

जीएसएसच्या बीएससी विद्यार्थ्यांचा ओरिएंटेशन प्रोग्रॅम

Amit Kulkarni

वृद्धांची काळजी घेण्यात कर्नाटक सरकार असमर्थ

Patil_p