Tarun Bharat

विकास, रोजगारासाठी काँग्रेसला विजयी करा

प्रतिनिधी/ सांखळी

युवकांचे भवितव्य केवळ काँग्रेसच्याच हाती. युवक देशाचे भविष्य. युवकांनी विचार करून निर्णय घ्यावा. देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले. गोवामुक्ती संग्रामतही काँग्रेसचेच मोठ योगदान आहे. प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट सरकार असून आता विकास, रोजगारासाठी काँग्रेसचे सरकार निवडून द्या, असे आवाहन कर्नाटकचे माजी मंत्री आर. बी. देशपांडे यांनी केले.

न्हावेली येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार प्रताप गावस, प्रभारी रवी बसवराज, युवा अध्यक्ष रियाज सययद, सचिव गौतम पियोळकर, वसंत मळीक, सांखळी काँग्रेस गट अध्यक्ष मंगलदास नाईक, वरद म्हार्दोळकर, राजेश सावळ यांची उपस्थिती होती.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, धार्मिक जपणूक करणारे राज्य म्हणून गोव्याची ओळख असून येथे जाती धर्माला थारा नाही. गोव्यात हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती एकाच आवयचे पुत कसे रावता हे युवकांनी कधीही विसरता कामा नये. मतदानाचे पूर्वी 25 वय होते ते राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 18 वर्षांच्या युवकांना मत देण्याचा अधिकार केला.

 गोवा सज्जन व प्रेमळ लोकांचे राज्य आहे. गोव्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. भेदभाव कधीच करीत नाहीत. प्रतापसिंह राणे यांनी काँगेस सरकारच्या माध्यमातून गोव्याचा विकास केला. तसेच सांखळीचा विकास केला.  गोव्यातील खाण उद्योग बंदावस्थेत असून अडीच लाख लोक बेकार झाले. भाजप सरकारने गोव्याचा सत्यानाश केला. पर्रीकर सरकारने खाणी बंद केल्या. मात्र पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोपही देशपांडे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या सांखळी मतदारसंघात राहुल गांधीच्या प्रचारामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पराभव निश्चित आहे. भाजपचे सरकार जाऊन काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. सत्तेवर आल्यानंतर बंद पडलेल्या खाणींच्या विषयावर पहिली बैठक घेऊन कायदेशीर खाण व्यवसाय पुन्हा सुरू करणार, असे आश्वासन रवी बसवराज यांनी दिले.

गेले तीन महिने सर्व जण फिरत होतो. कुणालाही उमेदवारी दिलीतरी एकजूट राहणार हे आश्वासन पाळले आहे. एकत्र येऊन जोरदार प्रचार सुरू असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे प्रताप गावस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात युवक बाहेर येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढा उभारत आहेत. सरकारी नोकरी घोटाळा करून नोकऱया विकून असंख्य युवकांना फसवले. बेकारी भत्ता, 50 हजार नोकऱया, 10 हजार सरकारी नोकऱया अशी अश्वासने देऊन युवकांच्या डोळय़ात धुळफेक केली. आणि आता 30 हजाराचे नोकऱयांचे खोटी आश्वासन दिली जात आहेत., असे आरोप युवा काँग्रेसचे वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी केला. पाहुण्यांची ओळख आणि स्वागत मंगलदास यांनी केले. त्यांनीच आभार मानले.

Related Stories

मालपे पेडणे येथे ट्रकला आपघात सुदैवाने चालक बचावला

Omkar B

बार्देशात पाच, सात दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन

Amit Kulkarni

भारतीय बॅडमिंटन संघ निवड चाचणीत गोव्याची तनिशा क्रास्टो

Amit Kulkarni

शैक्षणिक, राजकीय आरक्षणांसह एसटी बांधवांना वन कायद्यात संरक्षण द्या

Amit Kulkarni

उच्च न्यायालयाच्या निकालाचे भाजपकडून स्वागत

Omkar B

व्यापार परवाना शुल्कावर बैठकीत अंतिम निर्णय झालेला नाही

Patil_p