बॉलिवूडची लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच एका टीव्ही शोमध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत, पण जर या दोघांनी होकार दिला तर. आणि या होकाराची वाट स्मार्ट जोडी या शोचे निर्माते पहात आहेत. या शोद्वारे विकी व कतरिना यांचे भारतीय टेलिव्हिजनवर पदार्पण होणार आहे. डेसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात राजस्थानातील एका शाही हॉटेलमध्ये विवाहब्धंनात अडकलेल्या विकी आणि कतरिना या जोडीभोवतीचे वलय अजूनही कमी झालेले नाही. लग्नानंतर शूटिंगसाठी जाणाऱया विकीला एअरपोर्टवर सीऑफ करायला आलेली कतरिना प्रकाशझोतात आली. तर ख्रिसमस सेलिब्रेशनचे दोघांचे फोटोही खूप व्हायरल झाले. आजपर्यंत एकदाही एकत्र क्रिन शेअर न केलेली ही जोडी प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केले. आता त्यांना एकत्र पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांनाही आहेच, पण या जोडीला एकत्र घेऊन काही सिनेमा किंवा शो पडदय़ावर आणण्यासाठी अनेक निर्मात्यांनी विकी व कतरिनाशी संपर्क सुरू केला आहे. त्यापैकीच एक म्हणजे स्मार्ट जोडी हा शो. ‘स्मार्ट जोडी’ या शोच्या सुरुवातीच्या भागात विकी-कतरिनाने सेलिब्रिटी पाहुणे म्हणून हजेरी लावावी अशी निर्मात्यांची इच्छा आहे. जर विकी-कतरिना शोमध्ये पाहुणे म्हणून आले तर ही एक मोठी बाब असणार आहे. चाहत्यांना मेजवाणी असेल.


previous post
next post