अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार ठप्प : हेल्मेट, मास्क नसलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई


बेळगाव : नेहमी गजबजलेले शहर अशी ओळख असणाऱया बेळगावमध्ये विकेंड कर्फ्युमुळे रविवारी शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार ठप्प होते. तरी देखील विनाकारण बाहेर पडणाऱयांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे विकेंडचा आनंद नागरिकांनी घरीच राहून आपल्या कुटुंबांसमवेत घेतला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये शांतता दिसून आली. शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यत 55 तासांचा विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, दूध, फळे, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात मुभा देण्यात आल्याने रविवारी दुकाने सुरू होती. नेहमी गजबजलेले शहर असे ओळख असणारे बेळगावमध्ये विकेंड कर्फ्यूमुळे रविवारी शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार ठप्प होते. तरी देखील विनाकारण बाहेर पडणाऱयांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे विकेंडचा आनंद नागरिकांनी घरीच राहून आपल्या कुटुंबांसमवेत घेतला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये शांतता दिसून आली.


शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यत 55 तासांचा विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, दूध, फळे, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात मुभा देण्यात आल्याने रविवारी दुकाने सुरू होती. परंतु नागरिक घराबाहेर न पडल्याने दुकानदारांना ग्राहकांची वाट पहात बसण्याची वेळ आली. त्यामुळे दुपारनंतर अनेकांनी घरी जाणे पसंत केले.
विकेंडमुळे हॉटेल पार्सल तेजीत
विकेंडला हॉटेलमध्ये जाऊन ताव मारण्याचा अनेकांचा बेत असतो. परंतु विकेंड कर्फ्युमुळे रविवारी ते शक्मय झाले नाही. त्यामुळे हॉटेलमधून पार्सल मागवून नागरिकांनी ताव मारला. यामुळे हॉटेल जरी बंद असले तरी पार्सलची व्यवस्था मात्र तेजीत होती. शाकाहारीसह मांसाहारी पदार्थांना मागणी वाढल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.


शहरात शुकशुकाट, शिवारांमध्ये गोंधळ
रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने शहरात शुकशुकाट होता खरा पण शहराच्या बाजूलाच असणाऱया शिवारांमध्ये मात्र पाटर्य़ांचे बेत रंगत होते. मोठय़ा झाडाखाली अशा पाटर्य़ा होत होत्या. शिवारांमध्ये चाललेल्या धांगडधिंगाण्यामुळे शेतकरीही हतबल झाले होते. यामध्ये तळीरामांची संख्या अधिक होती. वडगाव, अनगोळ, जुने बेळगाव, वडगाव, येळ्ळूर, मजगाव, कंग्राळी या परिसरात रविवारी असे प्रकार दिसून आले.
पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरूच
बेळगाव शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला होता. शहरात येतानाच पोलिसांकडून चौकशी केली जात होती. समर्पक उत्तर न मिळाल्यास त्याला माघारी धाडले जात होते. याचसोबत हेल्मेट अथवा मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई केली जात होती. फिशमार्केट, आरपीडी चौक, शिवाजी उद्यान, चन्नम्मा चौक यासह इतर महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिसांकडून कारवाई केली जात होती.