Tarun Bharat

विकेंड लॉकडाऊनची कडेगांव शहरात कडक अंमलबजावणी

विना मास्क रस्त्यावर दिसाल तर कडक कारवाई

प्रतिनिधी / कडेगाव

कडेगांव तालुक्यात काल पासुन विकेंड लॉकडाऊनला सुरवात झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ८ वाजल्या पासुन ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत संपुर्ण संचारबंदी आहे.या कालावधीत अनावश्यक कुणीही नागरीकांनी घरा बाहेर पडू नये. रस्त्यावर फिरताना आढळले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याच बरोबर मोकाट विना मास्क फिरणाऱ्या वर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. व चौका चौकात युवक रात्रीच्यावेळी जमलेले असतात तसे दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल व फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल तरी तालुक्यातील सर्व नागरीकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ गणेश मरकड यांनी केले आहे.

त्याचबरोबर तोंडाला मास्क असणे अत्यंत आवश्यक आहे. मास्क लावले नसल्याचे आढळल्यास ५०० दंड केला जाईल व त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. ज्या नागरीकांचे वय ४५ पेक्षा जास्त त्या नागरीकांनी नजीकच्या लसिकरण केंद्रात व ग्रामिण रूग्णालयात जाऊन कोव्हीड 19 लसिकरण करून घ्यावे असेही प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड यांनी सांगितले यावेळी एस टी स्टॅण्ड परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात कडेगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पी बी भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे, उपसहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर जाधव यांनी विक अॅंड लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकुणच कडेगांव शहरात व मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक दुकान सोडून संपुर्ण बाजारपेठेत शुकशुकाट होता.

Related Stories

सत्यभामा करी रुदना

Patil_p

कर्नाटक: शिक्षणमंत्र्यांनी ‘विद्यागम’ योजनेचा घेतला आढावा

Archana Banage

विक्रेते, फेरीवाल्यांची चाचणी होणार

Patil_p

रूग्णालयांनी रुग्णाला उपचारासाठी नाकारले हे धक्कादायक: कुमारस्वामी

Archana Banage

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मिरजकर तिकटी येथे आंदोलन

Archana Banage

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको; एकनाथ शिंदेंचे निर्देश

Abhijeet Khandekar