Tarun Bharat

विकेंड लॉकडाऊनमध्ये पर्यटनासाठी निघालेल्यांची पोलीस चौकीतच स्वॅब तपासणी

Advertisements

शाहूवाडी पोलीस पथकाची दंडात्मक कारवाई

प्रतिनिधी / शाहुवाडी :

विकेंड लॉकडाउन कालावधीत पर्यटनासाठी निघालेल्या वाहनधारकसह पर्यटकांची आणि विनामास्क धरकांची शाहूवाडी पोलिसांच्या पथकाने मलकापूर पोलीस चौकीतच स्वॅब तपासणी करण्यात आली तर विनामास्क फिरत असलेल्याच्यांवर दंडात्मक कारवाई केली पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या पथकाने केली कारवाई.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊन सुरू आहे मात्र या कालावधीत मलकापूर शहरात गर्दी वाढतच आहे त्यातच शनिवार-रविवार सुटीच अवचित्य  साधून पावसाळी वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची गर्दी वाढू लागले आहे शहरात प्रवेश केलेल्या पर्यटकांसह नागरिकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली यामुळे पर्यटकांची चांगलीच धावपळ उडाली होती.

दरम्यान शहरातील अत्यावश्यक सदराखाली सुरू असलेल्या आस्थापना व रस्त्यावर व्यवसाय करत असलेल्या व्यावसायिकांचीही स्वॅब तपासणी करण्यात आली.

साहेब घरी जायच आहे हो

पर्यटकांच्या गाड्या थांबवून स्वॅब तपासणी सुरू असताना अनेक पर्यटक पोलिस प्रशासनाला विनंती करत होते विशेषता कॉलेज  युवतीही साहेब आम्हाला घरी जायच आहे अशी विनवणी करून स्वॅब तपासणी पासून दूर राहण्याचा पराकोटीचा प्रयत्न करत होती मात्र पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेऊन तपासणी केलेली केल्याने वाहनधारकांच्या सह नागरिकांच्यात   चांगलीच लगबग जाणवत होती
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक कोळगे, मलकापूर नगर परिषदेचे ए. के. पाटील, माने यांच्यासह, पोलिस कर्मचारी होमगार्ड, नगर परीषदेचे कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी सहभागी झाले होते .

Related Stories

नो कास्ट,नो रीलीजन प्रमाणपत्र मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली महिला ठरली प्रितिशा शाह

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीचे सरकार अनैतिक : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

विद्यापीठ हायस्कूलचे निवृत्त शिक्षक वि. गो. देसाई यांचे निधन

Abhijeet Shinde

जि.प. सदस्य राहुल आवाडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाचे ३६ बळी, १७२५ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

कुरुंदवाड शहरात सापडले दोन कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!