Tarun Bharat

विकेल ते पिकेल योजना शेतकऱ्यांना फायदेशीर : माजी आमदार प्रभाकर घार्गे

Advertisements

प्रतिनिधी / औंध

आर्थिकद्रुष्ट्या अडलेल्या शेतकऱ्यास पैशाची गरज असते यासाठी तो व्यापाऱ्यांच्या दारात माल घेऊन जातो. नडलेल्या शेतकऱ्यांची व्यापारी लूट करतात. पिकेल ते विकेल यामुळे थेट बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध होऊन त्यांचा आर्थिक फायदा होईल. असा विश्वास माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केला.

औंध ता खटाव येथे मंडल क्रुषी विभाग यांचे मान्यतेने राजमान्य शेतकरी उत्पादक कंपनी यांनी “विकेल ते पिकेल” योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रकल्प उपसंचालक आत्मा उत्तम देसाई, सभापती रेखा घार्गे, माजी सभापती शिवाजीराव सर्वगोड, संदीप मांडवे, मंडलक्रुषी अधिकारी अक्षय सावंत, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, दत्तात्रय जगदाळे, दिनकर शिंगाडे, मोहन मदने, तानाजी इंगळे, क्रुषी अधिकारी दिलीप दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

घार्गे म्हणाले की,तालुक्यात कोल्ड स्टोअरेज असल्याने मालाची साठवण  करणे फायदेशीर ठरेल. यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून अल्प दराने कर्जपुरवठा देखील करण्यात येतो. याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. उत्तम देसाई म्हणाले यापुढे क्रुषी विभागाच्या योजना वैयक्तिक स्तरावर कमी करून सामुहिक स्वरूपात राबवण्याचे शासनाचे धोरण आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी गट स्थापन करून शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. हणमंतराव शिंदे यांनी स्वागत केले. दिलीप दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास राजमान्य कंपनीचे सर्व संचालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

वाठार बुद्रुक खुनातील आरोपीकडून 2 पिस्तुल जप्त

datta jadhav

संचारबंदीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना सुविधा पुरविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त

Abhijeet Shinde

डिलीव्हरीबॉयनी चोरले पावणेदोन लाखांचे मोबाईल

Patil_p

तारळी धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी

datta jadhav

सातारच्या सैनिक स्कूलमध्येही ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू

Patil_p

सातारा : उपचारार्थ रुग्णसंख्या ३ हजारांच्या खाली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!