Tarun Bharat

विक्री दबावाने बाजाराने प्रारंभीची तेजी गमावली

सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसोबत बंद : मारुती, टेक महिंद्रा नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स व निफ्टी यांनी सकाळच्या सत्रात प्राप्त केलेली तेजी अखेर गमावली आणि बाजार घसरणीसोबत बंद झाला. यामध्ये जवळपास सकाळच्या वेळी 900 अंकांची प्राप्त केलेली उंची प्रभावीत होत सेन्सेक्स 77 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.

सप्ताहाच्या अंतिम दिवशीच्या प्रवासात सकाळी सकारात्मक स्थिती राहिली होती, परंतु सेन्सेक्सने दुपारच्या सत्रात जवळपास 58,000 च्या वरचा टप्पा गाठला होता. मात्र अंतिम क्षणी काही तास बँकिंग आणि वाहन कंपन्यांमधील समभागात मोठी विक्री राहिल्याने बाजाराला आपली तेजी गमवावी लागली असल्याचे दिसून आले.

दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 76.71 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 57,200.23 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 8.20 अंकांनी घसरुन निर्देशांक 17,101.95 वर बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमधील घसरणीमध्ये मारुती सुझुकी, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक आणि स्टेट बँक यांचे समभाग जवळपास तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.

जागतिक बाजारांतील अन्य बाजारात मिळताजुळता कल राहिल्याचे दिसून आले आहे. यामध्ये जपान व कोरियातील बाजार नकारात्मक स्थिती प्राप्त करुन बंद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.42 टक्क्यांनी वधारलेले दिसले.

मागील काही दिवस नकारात्मक स्थिती बाजारात दिसत होती. युरोपीयन स्थितीच्या परिणामामुळे विक्रीचा दबाव वाढल्यामुळे भारतीय बाजारात नकारात्मक परिस्थिती राहिली असल्याचे दिसून आले आहे.

सप्ताहातील मोठी विक्री

सप्ताहातील मोठय़ा विक्रीनंतर प्रमुख क्षेत्रांपैकी आयटी, रियल्टी आणि मिडकॅप व स्मॉलकॅपमधील प्रदर्शनात सुधारणात्मक स्थिती राहिली होती.

Related Stories

35 टक्के कमी कच्चे तेल मागवणार

Patil_p

शेअर बाजार सलग दुस-या दिवशी घसरणीत

Patil_p

टाटा समूहाकडून 500 कोटींचा मदतनिधी

tarunbharat

सेन्सेक्समध्ये 581 अंकांची घसरण

Amit Kulkarni

इपीएफओकडे जुलैमध्ये 8.45 लाख नवीन नावनोंदणी

Patil_p

टीव्हीएस करणार 1 हजार कोटींची गुंतवणूक

Patil_p