Tarun Bharat

विजयदुर्ग खाडीत राज्यस्तरीय खुली जलतरण स्पर्धा

12 गटात स्पर्धेचे आयोजन : 500 ते 5 किमी अंतराची स्पर्धा

वार्ताहर / देवगड:

श्री दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग व ग्रामपंचायत विजयदुर्ग आयोजित जिम स्वीम ऍकॅडमी कोल्हापूर पुरस्कृत तिसरी राजस्तरीय खुली समुद्र जलतरण स्पर्धा 2021 विजयदुर्ग खाडीमध्ये घेण्यात आली. 500 मीटरपासून अुनक्रमे 1 ते 5 कि.मी. अंतर अशा विभागात ही स्पर्धा घेण्यात आली.

 रविवारी विजयदुर्ग खाडीमध्ये तिसरी राज्यस्तरीय खुली समुद्री जलतरण स्पर्धा 2021 कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आली. 500 मीटर मुले-मुली, एक किमी मुले-मुली, 2 किमी मुले-मुली, 3 किमी मुलगे, 5 किमी मुले -मुली अशा 12 गटात स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आनंद देवरुखकर, सचिव सौ संजना आळवे, खजिनदार रविकांत राणे, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, देवगड पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण पाळेकर, कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, सामाजिक कार्यकर्ते संजय बोंबडी, प्रदीप साखरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, राजन रहाटे, मंडळाचे कार्याध्यक्ष  प्रथमेश धुरी, जिम स्वीम ऍकॅडमीचे अजय पाठक, तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि विजयदुर्ग ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत जलतरणपटूनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 500 मीटर मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक कु. आयुषी कैलास आखाडे (ठाणे)-4 मिनिटे 49 सेकंद, द्वितीय कु. दिशा होंडी (बेळगाव)- 5 मिनिटे 14 सेकंद, तृतीय कु. निधी तुषार सामंत (ठाणे)- 5 मिनिटे 30 सेकंद, 500 मीटर मुलगे प्रथम क्रमांक कु. निरंजन संदीप यादव (सातारा)- 5 मिनिटे 07 सेकंद, द्वितीय कु. विराट विपुल ठक्कर (ठाणे)-5 मिनिटे 17 सेकंद, तृतीय कु. रुद्र विकास निसार (ठाणे)- 5 मिनिटे 52 सेकंद, 1 किमी मुलींच्या गटात-प्रथम  कु. श्रे÷ा रोट्टी (बेळगाव)-6 मिनिटे 11 सेकंद, द्वितीय कु. आयुषी प्रशांत पाठक (कोल्हापूर)-6 मिनिटे 20 सेकंद, तृतीय कु. आरोही राजकुमार पालखडे-6 मिनिटे 45 सेकंद, 1 किमी मुलांच्या गटात– प्रथम कु. आदित्य रुपेश घाग (ठाणे)-5 मिनिटे 22 सेकंद, द्वितीय कु. प्रवीण माधव पाटील (ठाणे)- 5 मिनिटे 26 सेकंद, तृतीय कु. योगेंद्र गिरीधर तावडे (रत्नागिरी)-5 मिनिटे 48 सेकंद, 2 किमी मुलींच्या गटात-प्रथम कु. श्रावणी महेश वालावलकर- 9 मिनिटे 39 सेकंद, द्वितीय कु. तन्मयी विलास जाधव-9 मिनिटे 54 सेकंद, तृतीय कु. धन्वी बर्डे (बेळगाव)-10 मिनिटे 30 सेकंद, 2 किमी मुलांच्या गटात-प्रथम कु. सतरन माळगावकर (बेळगाव)- 8 मिनिटे 38 सेकंद, द्वितीय कु. सोहम प्रकाश साळुंखे (ठाणे)-8 मिनिटे 42 सेकंद, तृतीय कु. तनिष्क संदेश कदम-8 मिनिटे 47 सेकंद, 2 किमी मास्तर वूमन ग्रुप 1 मध्ये-प्रथम गायत्री फडके (पुणे)-15 मिनिटे 25 सेकंद, द्वितीय सुनीता वाघचौरे (पुणे)-17 मिनिटे 25 सेकंद, तृतीय  नलिनी शंकर पाटील (कोल्हापूर)-17 मिनिटे 47 सेकंद, 2 किमी मास्तर वूमन ग्रुप 2 मध्ये प्रथम तनया महेश मिल्के (रत्नागिरी)- 9 मिनिटे 25 सेकंद, द्वितीय गौरी महेश मिल्के (रत्नागिरी)-18 मिनिटे 39 सेकंद, 2 किमी मास्तर मेन ग्रुप 1 मध्ये प्रथम किरण आनंद पावेकर (सातारा)-10 मिनिटे 03 सेकंद, द्वितीय  हंबीरराव राजाराम पाटील (कोल्हापूर)-12 मिनिटे 3 सेकंद, तृतीय जितेंद्र वालवेकर (कोल्हापूर)-13 मिनिटे 54 सेकंद, 2 किमी मास्टर मेन – ग्रुप 2-प्रथम श्रीमंत श्यामराव गायकवाड (सातारा)-10 मिनिटे 42 सेकंद, द्वितीय प्रकाश दौलत किल्लेदार (कोल्हापूर)-10 मिनिटे 47 सेकंद, तृतीयसचिन शरद मुंज (पुणे)-12 मिनिटे 47 सेकंद, 3 किमी मुलगे-प्रथम कु. भागेश महेश पालव (सिंधुदुर्ग)-16 मिनिटे 3 सेकंद, द्वितीय कु. सोहम भरत पाटील (कोल्हापूर)-16 मिनिटे 12 सेकंद, तृतीय कु. ताहीर रहिमखान मुल्लाणी (कोल्हापूर)-16 मिनिटे 19 सेकंद, 5 किमी मुलीमध्ये-प्रथम कु. सुबिया रहिमखान मुल्लाणी (कोल्हापूर)- 36 मिनिटे 35 सेकंद, द्वितीय कु. अस्मिता अमर म्हाकवे (कोल्हापूर)-40 मिनिटे 11 सेकंद, तृतीय कु. जागृती सागवेकर (सागवे/वडप-विजयदुर्ग)-41 मिनिटे 12 सेकंद, 5 किमी मुलगे –प्रथम कु. आदित्य गडकरी (बेळगाव)-37 मिनिटे 8 सेकंद, द्वितीय कु. योगेश संजय केनवडे (कोल्हापूर)-37 मिनिटे 59 सेकंद (विभागून), द्वितीय कु. प्रेमसागर प्रमोद चव्हाण (कोल्हापूर)-37 मिनिटे 59 सेकंद, तृतीय कु. सागर संजय तलवार (रत्नागिरी)-38 मिनिटे 2 सेकंद यांनी यश प्राप्त केले. स्पर्धेसाठी मुख्यपरीक्षक म्हणून लाभले कैलास आखाडे, निळकंठ आखाडे, महेश मिल्के यांनी काम पाहीले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजयदुर्ग ग्रामपंचायत, एमएमबी कार्यालय विजयदुर्ग, विजयदुर्ग पोलीस ठाणे, आरोग्य विभाग देवगड यांची वैद्यकीय टीम, विजयदुर्गमधील बोटी मालक यांनी सहकार्य केले. आभार रविकांत राणे यांनी मानले.

Related Stories

दांडी येथे 11 रोजी मत्स्य दुष्काळ परिषद

NIKHIL_N

महाराष्ट्र : मंदिरांसह हॉटेलांबाबतचा निर्णय आज शक्य

Archana Banage

परप्रांतीय कामगाराची सावंतवाडीत आत्महत्या

NIKHIL_N

कोकणासह राज्यात पुन्हा ‘मुसळधार’ चा इशारा!

Patil_p

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात कोविशील्ड लस आता जवळच्या आरोग्य केंद्रात उपलब्ध

Archana Banage

जिल्हा शल्य चिकित्सकांची तातडीने बदली करा!

NIKHIL_N