Tarun Bharat

विजया ऑर्थोमध्ये तुटलेल्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

बसमधून जाताना पावसाचे तुषार हातावर घेण्यासाठी खिडकीतून हात बाहेर काढलेल्या पाच वषीय मुलीचा उजवा हात तुटला होता. तिच्यावर विजया ऑर्थो ऍण्ड ट्रॉमा सेंटर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल एक वर्ष हॉस्पिटलतर्फे तिचा फॉलोअप घेण्यात आला. आता ही मुलगी पूर्णतः बरी झाली असून हाताची हालचाल करत आहे.

आफिया शेख असे या मुलीचे नाव असून 12 जून 2019 रोजी ही दुर्घटना घडली. आफियाने हात बाहेर काढला असताना मागून भरधाव आलेल्या वाहनाच्या धडकेने तिचा हात दंडापासून निखळला. तुटलेल्या हातासह तिला त्वरित विजया ऑर्थोमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचे मुख्य प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल माळमंडे यांनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या हातावर शस्त्रक्रिया केली. तब्बल 10 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेसाठी पिडीऍट्रिक ऑर्थोपिडीशियन डॉ. अरविंद हप्पण्णवर, प्लास्टिक सर्जन डॉ. कौस्तुब देसाई, भुलतज्ञ डॉ. श्रीधर काथवटे व श्रीधर कलकेरी यांनी डॉ. विठ्ठल यांना मदत केली.

अवयव तीन तासात आणावा

अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्मिळ असून अपघातात किंवा दुर्घटनेत हात, पाय, बोटे तुटल्यास तुटलेला अवयव घेऊन तीन तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये आणावा, शक्मय असल्यास बर्फ घातलेल्या पास्टिकच्या पिशवीत घालून तो आणावा, असे आवाहन डॉ. रवि पाटील यांनी केले आहे.

Related Stories

कंग्राळी बुद्रुकला महिलास्नेही पुरस्कार प्रदान

Amit Kulkarni

दुर्गामाता दौडमुळे तालुक्यात भक्तिमय वातावरण

Amit Kulkarni

आज विविध भागातील वीजपुरवठा खंडित

Patil_p

सराफ कॉलनीतील रस्त्यांची दैनावस्था

Amit Kulkarni

संत मीरा, मुक्तांगण, चिटणीस, हेरवाडकर उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

बुडाच्या भूखंडाचा आकार सीटीसर्व्हेत होतोय कमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!