Tarun Bharat

विजयी चौकार फटकावण्याचे आरसीबीचे लक्ष्य

Advertisements

राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज आयपीएल साखळी सामना

मुंबई / वृत्तसंस्था

या मोसमात सलग 3 विजय नोंदवणारा आरसीबीचा संघ आज (गुरुवार दि. 22) राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएल साखळी फेरीत विजयाचा चौकार फटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीने यंदा जोरदार सुरुवात केली असून हीच विजयी घोडदौड यापुढेही कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार असेल. सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होईल.

आरसीबीने या मोसमातील सलामी लढतीत विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभवाचा झटका दिला आणि त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद व कोलकाता नाईट रायडर्सना देखील पराभूत केले आहे. सध्या हा संघ 3 पैकी 3 सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा संघ आतापर्यंत केवळ एकच विजय मिळवू शकला आहे. मागील लढतीत चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर ते सहाव्या स्थानी फेकले गेले.

राजस्थानला प्रामुख्याने सांघिक फलंदाजीच्या निकषावर अधिक झगडावे लागले असून ही त्यांची मुख्य चिंता आहे. संजू सॅमसनचा फॉर्म मात्र या संघासाठी बलस्थान आहे. पंजाब किंग्सविरुद्ध धडाकेबाज शतकासह त्याने जवळपास विजय खेचून आणलाच होता. अंतिम क्षणी त्यांची निराशा झाली. दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर व ख्रिस मॉरिस यांनी मात्र दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवून देण्यात काहीही कसर सोडली नाही.

चेन्नईविरुद्ध जोस बटलर धोकादायक भासला. मात्र, अन्य फलंदाज त्याला समयोचित साथ देऊ शकले नाहीत. गोलंदाजीच्या निकषावर राजस्थान रॉयल्ससाठी दिल्लीविरुद्धची लढत वगळता अन्य सामन्यातील अनुभव खराब राहिले आहेत. दिल्लीविरुद्ध जयदेव उनादकटने 15 धावात 3 बळी, असा भेदक मारा साकारला तर युवा चेतन साकरियाने देखील आश्वासक गोलंदाजी केली होती. आता जोफ्रा आर्चर संघात नसल्याने ख्रिस मॉरिस व बांगलादेशचा स्पीडस्टार मुस्तफिजूर रहमानवर राजस्थानचा अधिक भर असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

आरसीबी ः विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, यजुवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, जोशुओ फिलीप, शाहबाज नदीम, नवदीप सैनी, ऍडम झाम्पा, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डॅन ख्रिस्तियन, केएस भरत, सुयश प्रभुदेसाई, डॅनिएल सॅम्स, हर्षल पटेल.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयांक मार्कंडे, ऍन्डय़्रू टाय, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकारिया, केसी करिअप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

ग्लेन मॅक्सवेल बहरात परतल्याने आरसीबी मजबूत स्थितीत

विराटच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ यंदा ग्लेन मॅक्सवेल बहरात परतल्याने अधिक मजबूत भासत आला आहे. एबी डीव्हिलियर्सने आपला क्लास पुन्हा एकदा दाखवून दिला. शिवाय, टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकन संघातून पुनरागमन करण्याची आपली इच्छाही जाहीरपणे व्यक्त केली आहे. युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल मागील हंगामाप्रमाणे या हंगामात अद्याप पूर्ण ताकदीने तुटून पडत असताना दिसून आलेला नाही. अगदी विराट कोहलीकडून देखील मोठय़ा खेळीची प्रतीक्षा कायम आहे. दोनवेळा अपयशी ठरलेला रजत पाटीदार येथे त्याची भरपाई करण्यासाठी प्रयत्नशील असू शकतो.

हर्षल पटेल व मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱयामुळे आरसीबीला गोलंदाजीच्या लाईनअपवर फारशी चिंता नाही. हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध 5 बळी घेत आपला करिष्मा प्रत्यक्षात साकारुन दाखवला होता तर शाहबाज अहमदने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 7 धावात 3 बळी घेत एकाच षटकात सामन्याचे चित्र बदलून टाकले होते.

आश्चर्य म्हणजे आरसीबीने केकेआरविरुद्ध 4 ऐवजी 3 विदेशी खेळाडू खेळवत धक्का दिला होता. आजही ते हीच रणनीती अवलंबणार की, लेगस्पिनर ऍडम झाम्पा, जलद गोलंदाज केन रिचर्डसन किंवा अनुभवी अष्टपैलू डॅनिएल ख्रिस्तियन यांच्यापैकी एकाला संधी देणार, हे पहावे लागेल.

Related Stories

धक्कादायक! सांगलीत चोरट्यांनी फायरिंग करत ATM मशीन चोरले

Archana Banage

चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं

Archana Banage

MPSC ने सुरु केलं ट्विटर हँडल, अवघ्या २४ तासात टीकेचा भडीमार

Archana Banage

जनमानसात कमालीची अस्वस्थता; छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा

Tousif Mujawar

मुंबई सिटी एफसीचा इराकच्या क्लबला धक्का

Patil_p

बॉक्सर स्वीटी बूराने पदक केले शहीद शेतकऱ्यांना समर्पित

Archana Banage
error: Content is protected !!