दक्षिणेतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या ‘लाइगर ः साला क्रॉसबीड’चा बीग व्हिडिओ अनाउन्समेंट टीझर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर 31 डिसेंबरला चित्रपटाचा फर्स्ट ग्लिम्प्स प्रदर्शित करण्यात येणार आहे. लाइगर हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये 5 भाषा हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळी आणि कन्नडमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.


धर्मा प्रॉडक्शन्स आणि पुरी कनेक्ट्सच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱया ‘लाइगर’चे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. करण जौहर, चार्मी कौर, पुरी जगन्नाथ आणि अपूर्व मेहता याचे निर्माते आहेत. चित्रपटात विजय आणि अनन्यासोबत राम्या कृष्णन, विशू रेड्डी, रोनित रॉय, मकरंद देशपांडे, आली आणि गेटअप श्रीनू देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.


बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसन देखील चित्रपटात दिसून येईल.